Tuhi Re Maza Mitva 11 september 2025 Written Episode Update: अर्णवने ईश्वरीशी लग्न केले, घरात मोठा गोंधळ

Tuhi Re Maza Mitva 11 september 2025 Written Episode Update: अर्णवने ईश्वरीशी लग्न केले, घरात मोठा गोंधळ

अर्णवची चिंता आणि बेशुद्ध ईश्वरी

नमस्कार मित्रांनो, ‘तूही रे माझा मित्वा’ मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, “तुला माहिती नाहीये, तो राकेश तुम्हा सगळ्यांना फसवतोय आणि त्याने आम्हाला पण फसवलंय. माझ्या ताईशी लग्न करून तो आमच्या घरात घरजावई बनून राहतोय. तुला काहीच माहिती नाहीये आणि त्यामुळे आता लक्ष देऊन ऐक, मी काय बोलतोय ते. थांब, मी तुला लग्नाचा फोटो दाखवतो. Will you Trust me?” असं म्हणून तो आता तिला राकेशचा आणि अंजली ताईचा लग्नाचा फोटो दाखवत असतो आणि म्हणतो, “बघ, बघ तू, काही बोलत का नाहीयेस? बोल ना आता!” असं तो तिला ओरडतो. नंतर त्याचं लक्ष तिच्याकडे जातं, तेव्हा ती बेशुद्ध पडलेली असते. तो म्हणतो, “Oh यार, Shit!” असं म्हणून तो तिच्याकडे धावतो आणि ती पडलेली पाहून त्याला खूप वाईट वाटतं. “Miss इंदोर,” असा तो आवाज देतो, परंतु ती तिथून काही हलायला तयार नसते. त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी बेशुद्ध पडलेली आहे आणि म्हणूनच तो तिला जवळ करतो आणि म्हणतो की, “हिला आता Doctor कडे घेऊन जायला हवं.” आणि म्हणूनच तो आता तिला उचलून गाडीमध्ये ठेवायला चाललेला असतो.

पैशांसाठी राकेशला धमकी

तर राकेश आता खूपच वैतागलेला असतो आणि राकेश गाडीने निघालेला असताना, त्याची बाईक ही समोरच बरोबर दादाच्या गाडीला जाऊन पुढे उभी राहते. तेव्हा मग दादा गाडीतून उतरतो आणि म्हणतो, “काय रे, माज आलाय का तुला? इथे मध्येच कशाला आमच्या गाडीच्या मध्ये आलास? आणि काय, तू त्या Hotel मध्ये गेला होतास ना? काय झालं? अरे, त्या मुलीबरोबर Honeymoon करायचा होता, तुझं झालं काय?” तेव्हा लगेच आता त्याचा दुसरा माणूस म्हणू लागतो, “दादा, अरे कसा करेल हा Honeymoon? अरे काय झालं, तो Honeymoon ला जायच्या अगोदरच Police त्याच्या समोर दुधाचा ग्लास घेऊन उभे राहिले, तर काय करेल तो?” सगळे त्याच्यावर, राकेशवर हसत असतात. तेव्हा मग आता तो म्हणतो, “हे बघ, लक्षात ठेव, काही झालं ना तरीही तुझं हे जे काही काम आहे ना, ते पूर्ण होऊ शकणार नाही. तू ठरवलेल्या कामासाठी ज्याला तुला सोडलं, ते झालं नाही. मग आता माझे पैसे? माझे पैसे कधी देणार?” तेव्हा तो म्हणतो, “दादा, अहो तुम्ही सारखा सारखा काय तोच प्रश्न विचारताय? तुमचे पैसे देतो बोललो ना मी.” तेव्हा तो त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो, “पैसे देतो नाही, तुला पैसे द्यावेच लागणार आहेत. ठरलेल्या वेळेवर जर तू पैसे दिले नाही ना, तर बघ मी तुझं काय करतो ते. तुला जिता काढेन मी, लक्षात ठेव. तिथल्या तिथे जिता काढून टाकेन.” आणि हो, त्याच्या माणसांना तो सांगतो की, “लक्षात ठेवा रे, आणि हा, ठरलेल्या वेळेप्रमाणे जर याने पैसे दिले नाही, तर त्याला तिथल्या तिथं जिता काढा. कळलं ना? चला, चल आता, काढ तुझी गाडी बाजूला. जाऊ दे माझ्या गाडीला.” असं म्हणून तो आता गाडीत बसतो आणि त्याची Car घेऊन चाललेला असतो. त्याच वेळेला आता खूप चिडलेला राकेश दरवाजाकडे बघतच राहतो आणि नंतर जात असताना त्याच्या गाडीवर तो दगड मारतो आणि म्हणतो, “काय, मला जिता काढणार आहे का तू?” असं म्हणून आता तो रागाने चिडलेला असतो आणि स्वतःची गाडी घेऊन तिकडून आता तो निघून चाललेला असतो.

अर्णवच्या घरी चिंतेचे वातावरण

तिथून निघून जात असताना त्याच्या डोक्यात येत असतं की लवकरात लवकर मला आता Miss इंदोर म्हणजेच ईश्वरी कुठे गेली ते बघितलं पाहिजे. आणि इथे सगळी जण Tension मध्ये असतात की आता काय करायचं आहे. मामा म्हणतो की, “हो, अजूनही अर्णवचा काही फोन आला नाहीये. नक्की काय होतंय तिकडे काहीच कळत नाहीये.” त्यावर आता लगेच अंजली म्हणते, “काय माहिती कुठे गेलाय तो. त्याचा फोनही लागत नाही आणि फोन केला तर उचलतच नाहीये. ईश्वरीचा पण फोन लागत नाही. नक्की काय झालं काहीच कळत नाहीये.” आता ते लोक सगळे Tension मध्ये आलेले असतात. त्याचबरोबर आकाशही बघत असतो की कधी दादा येतोय. त्याचे दरवाजाकडे लक्ष असतं. मामा म्हणतो, “हे बघा, नका काळजी करू. पण मला एक Tension येतंय की आता काय घडलं असेल. ते अर्णवने हे जे सगळं काही केलं असेल, मग काय होणार आहे? काहीच कळत नाहीये.” आता त्यावर आकाश म्हणतो, “Dad, त्यात कळायचं काय आहे? कशाला काही कळायला हवं? ते दोघंजणही Adults आहेत. They can take their decisions आणि दोघंही Independent आहेत. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला असेल, तो त्यांच्या मनाने घेतला असेल.” असं तो बोलून दाखवतो.

आजीची प्रार्थना आणि वल्लरीचा सवाल

तर इकडे आजी ही देवघरात आलेली असते आणि देवाजवळ हात जोडून असते की, “माझा चिंटू लवकरात लवकर परत येऊ दे आणि कुठलंही अघटित घडायला नको.” म्हणून ती देवीकडे प्रार्थना करत असते. आणि मग सारखी तिथून फेऱ्या मारत असते. आणि तिला आठवतं कशाप्रकारे अर्णवने News Channels मध्ये Decide करून जाहीर केलेलं असतं की, ‘ही ईश्वरी राजेश शिरके आहे, Mrs. ईश्वरी राजेश शिरके’. हे ऐकल्यानंतर लावण्याची काय हालत झाली होती, ‘हे सगळं ऐकण्याच्या अगोदर मी मरून का नाही गेली,’ हे सगळं आता तिचं बोलणं आजीला आठवतं आणि आजी सारखं सारखं हात जोडत असते. तर वल्लरीने म्हटलेलं असतं की, “आई, या सगळ्याला आता कोण जबाबदार आहे? मला सांगा, हे सगळं कोण झेलणार आहे? ईश्वरीने अर्णव सोबत लग्न केलेलं आहे. मग या सगळ्याला कोण जबाबदार?” हे सगळं आता जेव्हा आजीला ती सांगते, तेव्हा तिला खूप राग येत असतो आणि आठवत असतं की कशाप्रकारे वल्लरीने बदनामीची उत्तरं मागितलेली असतात.

मामाचा पाटीलला फोन

नंतर आता मामा विचार करतो की, पाटीलशी मी बोलून घेतो, नक्की काय चालू आहे, अर्णवबद्दल काही पत्ता लागतोय का आणि त्या राकेशचा हिशोब करण्यासाठी. तेव्हा मग पाटीलला तो फोन लावतो आणि पाटील गाडी चालवत असताना म्हणतो, “मामासाहेबांचा फोन” आणि फोन उचलतो. “बोला की मामासाहेब.” मग मामा म्हणतो, “हे बघ पाटील, खूप मोठा Problem झालाय. अर्णव हा बाहेर निघाला ईश्वरीला वाचवण्यासाठी. तू News वगैरे बघितलीस की नाही?” तेव्हा मग तो म्हणतो, “नाही, काय झालं News मध्ये? मी नाही बघितली.” तेव्हा मग मामा सांगतो, “अरे, ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही बाहेर आहेत आणि दोघं एकत्र आहेत, पण काय झालंय काहीच कळत नाही.” तेव्हा मग आता मामाला तो सांगतो, “मला काय माहित नाही, परंतु आम्हाला माहितच होतं की ती ईश्वरी ताई आहेत ना, त्याच आपल्या वहिनीसाहेब होणार आहेत.” “काय झालं?” तो म्हणतो की, “अरे, त्या दोघांनी लग्न केलं असं चर्चेला उधाण आलंय Media मध्ये. बहुतेक नक्की काय प्रकार आहे तो मला माहित नाही. ठीक आहे, ते सगळं अर्णव येऊन सांगेल. परंतु तो राकेश आहे ना, तो राकेश ईश्वरीला घेऊन गेला होता आणि त्यामधूनच वाचवण्यासाठी अर्णवने काहीतरी केलेलं असणार आहे, मला माहिती आहे. म्हणूनच तू जरा त्या राकेशवर लक्ष ठेव. तो तुला माहिती आहे ना कसा आहे. ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झालं म्हटल्यावर तो काही करू शकतो, त्यामुळे तू जरा त्याच्यावर लक्ष ठेव.” पाटील म्हणतो, “नका काळजी करू मामासाहेब, मी त्याचे जुने हिशोब सगळे चुकते करायचे ठेवतो. लक्ष त्यावरती, नका काळजी करू. त्या भस्म्याला बरोबर बघतो मी.” असं म्हणून मामाला तो जरासं शांत करतो.

डॉक्टरांनी सांगितले ईश्वरीच्या बेशुद्धीचे कारण

लावण्य खूप वैतागूनच Room मध्ये येते आणि म्हणते, “काय, काय करू आता मी? मला कळत नाहीये. तो अर्णव हा त्या ईश्वरीशी लग्न करून बसलाय. आता काय करायचं मी?” तेव्हा मग आता लगेच वल्लरी म्हणते, “हे बघ लावण्या, अगं या लग्नाला लग्न म्हणत नाहीत. त्याने फक्त Media समोर लग्न केलंय, घरातल्यांसमोर केलंय का? तर नाही. त्यामुळे त्याच्या लग्नाला कोणीही मान्यता देणार नाही. म्हणून तूही आता त्या गोष्टीचा विचार करू नकोस. त्याचं लग्न आहे, त्या लग्नाला कधीही आपण होकार द्यायचा नाही. म्हणूनच तो आला की आपण त्या लग्नाला धुडकावून लावायचं.” असं ती तिला सांगत असते. तेव्हा अर्णव Doctor कडे आलेला असतो आणि डॉक्टरांना विचारतो, “काय झालंय? तिची तब्येत ठीक तर आहे ना?” तेव्हा मग आता Doctor म्हणत असतात, “हो, actually काय झालंय की त्या बेशुद्ध पडल्यात आणि खूप त्यांना त्रास झालाय आणि त्यामुळे त्यांना हा सगळा तणाव आला आणि त्या बेशुद्ध आहेत.” त्यावेळेला मग अर्णव म्हणतो, “पण ती बेशुद्ध कशी काय झाली?” तेव्हा Doctor म्हणतात, “Actually, कुठल्यातरी खाण्यामधून, काहीतरी पिण्यामधून त्यांना अगदी Heavy Dose दिला गेलाय आणि त्यामुळे हे सगळं होतंय. या Heavy Dose मुळे त्यांना हा सगळा त्रास होतोय. आणि काळजी करू नका, मी त्यांना Injection दिलंय, त्यामुळे Injection मुळे त्यांना लवकरात लवकर जाग येईल आणि त्या लवकरच उठतील. तुम्ही नका काळजी करू.”

ईश्वरीच्या सुरक्षेसाठी अर्णवचा मोठा निर्णय

तेव्हा आता अर्णव खूप Tension मध्ये येतो. त्याच्या लक्षात येतं की तिथे चहाचे कप होते, त्यामधून ईश्वरीला काहीतरी राकेशने दिलेलं असणार. आणि Doctor सांगतात की, “त्यांना Injection दिलंय, शुद्ध येईल, तुम्ही नका काळजी करू.” आता अर्णव खूप घाबरलेला असतो आणि विचार करतो की Miss इंदोर ही तर बेशुद्ध आहे, परंतु बाहेर चर्चेला उधाण आलेलं असणार. आणि मला माहिती आहे, हे सगळं होत असताना राकेश काही शांत बसणार नाही. एकदा की त्याला कळलं की मी ईश्वरी सोबत लग्न केलंय, तर मग तो गप्प बसणार नाही. तो काहीतरी नक्कीच करणार. आणि तो तिकडे घरी जाऊन काहीतरी तमाशा करण्यापेक्षा किंवा आणखी दुसरं काहीतरी करण्यापेक्षा, मला Miss इंदोरला इथून घेऊन गेलं पाहिजे. आणि तसंही, Miss इंदोर जर पुन्हा तिच्या घरी गेली, तर मात्र राकेशच्या तावडीतून ती काही सुटू शकणार नाही. राकेशची घाणेरडी नजर तिच्यावर असेल आणि त्यामुळे मला काहीतरी करून तिला या सगळ्या घाणेरड्या नजरेपासून वाचवलं पाहिजे. त्यासाठी मी तिला माझ्या घरी घेऊन जायला हवं. तसंही माझं तिच्याशी लग्न झालंय, मग लग्न झाल्यानंतर ती Officially बायको म्हणून माझ्याच घरात राहील. आणि जेणेकरून यामधून तरी त्या राकेशची वाईट नजर ही माझ्या इंदोरवर नसेल.

त्यामुळे मी हे सगळं करायला तयार आहे आणि Miss इंदोर जर माझ्या घरी असली, तर तिला कोणत्याही प्रकारचा Problem येणार नाही. म्हणून तो आता Decide करतो की आता तसं तर आमचं लग्न झालं आहे, मग लग्न झालं म्हणून आता काही करून मी Miss इंदोरला माझ्या घरी घेऊन जाईन. आणि राकेश काही करेल किंवा तिच्याबरोबर काही जबरदस्ती करेल, त्याच्या अगोदरच आमचं लग्न झालंय म्हणून आता काही घाबरण्याची गरज नाही. Miss इंदोरला फक्त माझ्याच घरी ठेवलं पाहिजे. आणि हो, जर माझ्या घरी नाही ठेवलं, तर मात्र तिच्या घरी ती Risk मध्ये असू शकते, कारण तिच्या घरातले सगळे त्या राकेशच्या Influence खाली आहेत. म्हणूनच मला हा निर्णय घेतलाच पाहिजे. ईश्वरी ही माझीच राहणार आहे आणि ती माझ्याच घरी राहणार आहे, असं आता अर्णवने स्वतः ठरवलेलं असतं, ते फक्त तिच्या Safety साठी आणि त्या राकेशच्या बळी पडू नये म्हणून, हे सगळं खरंतर अर्णवने विचार केलेला असतो.

राकेशला कळले लग्नाचे सत्य, पायाखालची जमीन सरकली

म्हणून आता अर्णव हा ईश्वरीला उचलून घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच तिथे Doctor येते आणि म्हणते, “Hello Mister, तुम्ही काय करताय? अहो, त्यांना अजून शुद्ध आली नाहीये.” तेव्हा तो म्हणतो, “नाही Ma’am, शुद्ध येईल, थोड्या वेळात येईल. तुम्ही सांगितलं ना Injection दिलंय.” तेव्हा मग ती म्हणते, “हो, Injection दिलंय, पण त्यांना थोडा वेळ आराम करू दे ना.” तेव्हा मग तो म्हणतो, “Ma’am, आम्हाला खूप Urgency आहे, इतका वेळ थांबता येणार नाहीये. Please try and understand.” तेव्हा मग तो गाडीमध्ये बसून तिला घेऊन चाललेला असतो. Doctor सांगते, परंतु तो ऐकत नाही. तेव्हा राकेश आता एका ठिकाणी चहाची टपरी बघतो आणि जरा Tension कमी होण्यासाठी म्हणून चहाच्या टपरीजवळ येतो. तर इथे अर्णव ईश्वरीला उचलूनच, Doctor चं न ऐकता तिथून निघून गेलेला असतो. आणि त्यानंतर मग आता राकेश चहाच्या टपरीवर येतो आणि म्हणतो, “एक चहा टाक रे जरा.” तेव्हा मग आता चहा टाकायच्या वेळेलाच तो चेहऱ्यावर पाणी मारतो आणि बाजूला एक माणूस बसलेला असतो, त्याच्या मोबाईलमध्ये News सुरू असते अर्णव राजे शिरकेची. आता ती News पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसतो, “काय, अर्णव राजे शिरकेची News?” आणि ती News पाहून त्याच्या पायाखालची अगदी जमीनच हादरते की, ‘Businessman अर्णव राजे शिरके यांनी ईश्वरी देसाई हिच्या सोबत लग्न केले’.

आता हे ऐकल्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीन हदरून तो त्याच्याकडे बघतच राहतो आणि त्याला वाटतं की, ‘काय, ही News खरीच आहे का?’ म्हणून तो त्याच्याकडे आता बघायला, ऐकायला जातो. तेव्हा त्या माणसाच्या मोबाईलवरती News सुरू असते की अर्णव राजे शिरकेनी लग्न केलंय आणि ईश्वरीला तो तिथून गाडीच्या इथून घेऊन जात असताना त्याला तिथे आठवतं. आणि ती पोलिसांची Raid, सगळं काही मोबाईलमध्ये दिसत असतं. नंतर राकेशला आठवतं की कशाप्रकारे तो ईश्वरीला शेवटी चहा प्यायला देतो, ईश्वरी चहा नको म्हणत असताना तो म्हणतो की, ‘घ्या, पिऊन घ्या, गोड आहे.’ असं म्हणून तो साने मास्तरांचा Call आला म्हणून जरा बाजूला आलेला असतो. आणि त्याच वेळेला हे सगळं अर्णवने केलंय की काय, अशी त्याला आता भीती वाटायला लागते. म्हणूनच तो पटकन स्वतःचा मोबाईल घेतो आणि म्हणतो की, “काय, या अर्णवने स्वतः ईश्वरीशी लग्न केलंय?” आणि तेवढ्यातच त्याला आठवतं की जेव्हा पोलिसांची Raid पडली, तेवढ्यातच मला त्या दादाच्या माणसांनी गाडीतून बाहेर ढकललं आणि समोर सगळं दिसलं म्हणून मी तिथून पळून निघालो.

आणि तेव्हा तो स्वतःचा मोबाईल चालू करतो आणि त्यामध्ये Latest News अशी असते की, ‘प्रसिद्ध Businessman अर्णव राजे शिरके हे एका मुलीबरोबर, म्हणजेच ती त्यांची बायको आहे असं सांगतायत आणि तिच्याबरोबर ते आता Lodge मध्ये सापडलेले आहेत’. आणि त्यावेळेला राकेशला धक्काच बसतो. तो म्हणतो, “काय? म्हणजे याचा अर्थ या अर्णवने तिथे वेळेवर पोहोचून माझ्या इंदुरी जिलबी सोबत लग्न केलंय? नाही, मी अजिबात सहन करणार नाही आणि यासाठी मी त्याला अजिबात माफही करणार नाही. अर्णव राजे शिरके, हे सगळं करून तू खूप मोठी चूक केलीस, तू खूप मोठा पंगा घेतलास माझ्यासोबत. तुला काय वाटतंय की तू ईश्वरी सोबत लग्न केलंस आणि मग तू मला हरवू शकतोस? अजिबातच नाही. तू आता काय काय करतोस ते बघ. जोपर्यंत माझं ईश्वरी सोबत लग्न होणार नाही ना, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही.” असं म्हणून आता राकेश हा खूपच Tension मध्ये आलेला असतो.

अर्णव ईश्वरीला घेऊन घरी पोहोचतो

त्यानंतर अर्णव आता गाडी घेऊन घरी आलेला असतो. ईश्वरी अजूनही बेशुद्धच असते. आकाश त्याला लांबून बघतो आणि आवाज देतो सगळ्यांना, “या, सगळेजण या please, अर्णव दादा आलाय.” आणि मग तो आजीलाही बोलवायला जातो, “आजी, दादा आलाय, please बाहेर ये.” तेव्हा मग सगळेजण आता बाहेर येतात आणि अर्णव हा ईश्वरीला घेऊन आता गाडीतून बाहेर उतरतो. ईश्वरी ही अजूनही बेशुद्धच असते. अर्णव तिला उचलून, अगदी हातावर घेऊन तिच्या स्वतःच्या घरी घेऊन येत असतो. आणि अर्णवला अशा अवस्थेत पाहून लावण्याची अगदी जळफळ होत असते, कारण त्याने ईश्वरीला उचलून आणलेलं असतं. आणि आकाश हे सगळं बघतो, त्यालाही समजत नसतं आणि मामा, अंजली सगळेजण अगदी धक्क्यात असतात आणि ते अर्णवकडे बघत असतात.

वल्लरी आणि लावण्याचा घरात गोंधळ

तेवढ्यातच मामा आणि बाकीचे सगळे बाहेर येतात. अर्णव देखील चालत चालत आतमध्ये येत असतो. आता सगळ्यांचे चेहरे अगदी घाबरल्यासारखे झालेले असतात. मामा हा घाबरतो, अंजलीही घाबरते, परंतु लावण्या आणि वल्लरी, दोघीजणींच्या अगदी तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. मामा म्हणतो, “अर्णव, अरे ये.” अंजली म्हणते, “अरे, ही ईश्वरी आहे ना? आणि ईश्वरी अशी का, म्हणजे तिला काही झालंय का?” असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो. तेवढ्यातच आता अर्णव असं तिला का घेऊन आलाय, याचा विचार सगळ्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. आता अर्णव हळूहळू पुढे तिला चालत चालत घेऊन येत असतो. त्यावेळेला आता ती आल्याबरोबर लावण्या आणि वल्लरी चिडतात. लावण्या त्याला बघते आणि म्हणते, “What is this AR?” आणि मग तो आतमध्ये पाऊल टाकून येत असताना, लगेच तिथून वल्लरी ओरडते, “एक मिनिट अर्णव, तिथेच थांबायचं. आतमध्ये यायचं नाही.” तेव्हा मग आता अर्णवची मान खाली झुकलेली असते, कारण थोडं का होईना, त्याच्याकडूनही मोठी चूक झाली आहे, परंतु ती ईश्वरीसाठी, हे त्याला माहित असतं आणि म्हणूनच तो आता समोरून चालत येत असतो.

अर्णवला अडकवण्यासाठी राकेशचा नवीन कट

सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि अर्णवची खूपच अशी हालत झालेली असते. ईश्वरी अजूनही शुद्धीवर नसते. तेव्हा मग आता ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, ते सगळ्या जणांची त्याच्यावर नजर पडते. आणि त्याच वेळेला अंजली म्हणते, “चिंटू, अरे काय झालंय? हे सगळं काय आहे? आणि ईश्वरी, ती अशी काय आहे? तिला… म्हणजे ती अशी काय, तिची कुठली अवस्था झाली अशी? ती अजूनही शुद्धीवर नाहीये.” तेव्हा मग आता लगेच लावण्य म्हणते, “What is this AR?” असं म्हणून ती त्याच्यावर ओरडत असते. आता राकेश विचार करतो की, नाही, काही झालं तरीही मला हे लग्न मान्य करता येणार नाही. जर अर्णवच्या घरातल्यांनी आणि ईश्वरीच्या घरातल्यांनी समजा हे लग्न मान्य केलं, तर मात्र माझ्या हातात काहीच उरणार नाही. माझी इंदुरी जिलेबीला मला माझं कायमचं करायचंय. आणि नाही झाली तरी बदनामी, म्हणून तो पटकन फोन करतो आणि म्हणतो, “दादा, एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे.” तेव्हा मग आता दादा म्हणतो, “अरे, आता कोणतं तुझं महत्त्वाचं काम आलं रे?” तेव्हा तो सांगतो की, “दादा, काय ना, माझ्याबरोबर जी मुलगी होती ना, त्या मुलीचं तुम्हाला जरा सांगायचं होतं.” तेव्हा मग तो म्हणतो, “काय, कसलं काम होतं मग?” “तेव्हा मग त्या मुलीला उचलायचं आहे तिच्या घरून आणि असं दाखवायचं आहे की ती जी Kidnapping केलेली होती ना, ती अर्णव राजे शिर्केनी केलेली होती.”

तेव्हा मग तो म्हणतो, “काय रे, हे आता नवीन काम तू देतोयस? अगोदरच्या कामाचे पैसे काय तुझा बाप देणार का?” तेव्हा मग तो म्हणतो, “हे बघा दादा, कशाला उगीच बाप काढताय? तुम्हाला मी तुमचे पैसे परत देतो ना, तुम्ही कशाला चिंता करताय?” तेव्हा मग तो म्हणतो, “अरे, तुझे अगोदरचेच पैसे बाकी आहेत आणि तू आता काय करणार आहेस?” तेव्हा तो म्हणतो, “देतो दादा, तुमचे सगळे पैसे देतो. हा शब्द देतोय ना तुम्हाला. राकेश अजिबात तुमचे पैसे मी चुकवणार नाही. तुमचे अगोदरचे Record आहेतच ना, पैसे late दिलेत पण दिलेत ना तुम्हाला मी.” तेव्हा मग तो म्हणतो, “असं करायचं की त्या अर्णव राजे शिरकेवर लक्ष ठेवायचं आणि ती त्याच्याकडे जी मुलगी आहे ना, ती मुलगी उचलून आणायची. आणि जरीही ती मुलगी उचलता आली नाही, तरीही असं चित्र भासवायचंय की तिचं जे आता Kidnapping झालं होतं ना, ते Kidnapping अर्णव राजे शिर्केने केलंय.”

आणि मग तो म्हणतो, “ठीक आहे, करतो तुझं हे काम करतो, पण यात माझा फायदा काय?” तेव्हा तो सांगतो, “दादा, अहो तुम्हाला double फायदा आहे ना! तुमचं काम पण होऊन जाईल, तुमचे पैसे पण मिळतील आणि तुम्हाला मुलगी पण मिळेल.” तेव्हा मग तो म्हणतो, “अरे अरे, तुझं डोकं चालतंय का? जर दोन्हीही गोष्टी झाल्या नाही, तर मात्र माझा फायदा कसला, माझा loss च झाला ना रे! तुला कळतंय का, तुझं डोकं चालतंय का, तू काय बोलतोयस ते? माझं तू काहीच केलं नाहीस तर मी सगळ्या बाजूने अडकलो जाऊन, शिवाय त्या मुलीचं Kidnapping…” मग तो सांगतो, “नाही दादा, अजिबात घाबरू नका. सगळं काम, तुम्ही… आपण म्हणतोय ना, तसंच ठरणार. फक्त एकच करायचंय, ते म्हणजे जर तुम्हाला मी पैसे दिले नाही, तर मात्र ती तुम्हाला मुलगी पण देऊ शकतो.” तेव्हा तो ऐकतच राहतो आणि म्हणतो, “काय करणार बघा, ती मुलगी आहे. अहो ती काय साधी-सोपी नाहीये. अहो, 24 Carat सोनं आहे ते, 24 Carat. त्यामुळे तुम्हाला फायदाच फायदा होणार. पण मी तुमचे पैसे नक्की परत देणार.”

असं आता राकेश त्याला सांगतो आणि फोन ठेवतो आणि कामाला लागायला सांगतो. तेव्हा दादा म्हणतो, “ठीक आहे, तू बोलतोयस म्हणून कामाला लागतो. पण यात जराही फसलो, तर बघ तुझं काय करतो मी.” आता राकेश मनातच म्हणतो, “अर्णव राजे शिरके, तुला काय वाटलं, मी तुला आता सोडेन? अजिबात नाही. अगोदर गेलास तू Jail मध्ये, मग आता ईश्वरी देसाईच्या Kidnapping प्रकरणात पुन्हा तुला Jail मध्ये टाकतो की नाही ते बघ.”

लावण्याचा अर्णववर संताप

लावण्य वैतागलेली असते, ती म्हणते, “What the hell do you think? मी, काय वाटतंय तुला, मी कोण आहे? मी इथे पडलेली कोण आहे? तू असं सरळ माझ्यासमोर या मुलीला घेऊन आलायस, तुला काही वाटतंय की नाही, AR?” असं आता ती त्याच्यावरती ओरडत असते. तेव्हा मग अर्णव फक्त तिचं ऐकत असतो, काहीच बोलत नसतो. तेव्हा मग लगेचच तिला शांत करत अंजली म्हणते, “Please लावण्या, शांत हो.” ती शांत होत नसते. ती म्हणते, “कशी शांत होऊ मी ताई? हे काय बघतेय काय मी इथे? आपली हळद होती ना आज यार, आपलं लग्न होतं उद्या आणि आज आपली हळद सोडून तू असा निघून गेलास आणि आता माझ्यासमोर येतोस, ह्या त्या Middle Class मुलीला घेऊन! काय आहे तुझं हे AR? मला खरंच कळत नाहीये, तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस, मला समजत नाहीये AR. No, मला हे अजिबातच आवडलेलं नाहीये. What the hell you think? मी… मला नाही कळत आहे तू हे सगळं का वागतोस, ह्या Middle Class मुलीबरोबर! जिचा मला इतका राग येतोय, त्या मुलीलाच तू माझ्यासमोर घेऊन आलास! आणि तू तिथे News Channels वर काय दाखवत होतास? काय बोलत होतास की आमचं लग्न झालंय? What the hell is this Marriage? आम्ही या Marriage ला मानतच नाही.
अरे, असं लग्न करून कोणी मंगळसूत्र घालून एकमेकांशी लग्न होतं का? कळतंय का तुला काही? तू माझ्याशी लग्नाचे सगळे वचन आणि विधी निभावत होतास आणि आता या Middle Class मुलीला या घरात घेऊन आलायस.” असं म्हणून ती त्याच्यावर ओरडते.

ईश्वरीच्या घरी तणाव, आत्याचा पोलिसात जाण्याचा निर्णय

तेव्हा मग आता लावण्य जे काही बोलत असते, ओरडत असते, त्यामुळे आजी म्हणते, “एक मिनिट, सगळ्यांनी जरा शांत व्हा.” तेव्हा मग आता अंजली म्हणते, “लावण्या, please तू शांत हो. आणि चिंटू, ईश्वरीला काय झालंय? ती अशी काय आहे?” तेव्हा मग लगेच लावण्य वैतागते, “खरंच ताई, really? मला इथे त्रास होतोय, तो मला… कोणाला माझा… कोणाला बघवत नाहीये का? अरे, हे सगळं काय चालू आहे? माझा त्रास कोणाला दिसत नाही? आणि ताई, तुम्ही या Middle Class मुलीची अजूनही काळजी करताय?” तेव्हा मग आता लगेचच अंजली म्हणते, “Please लावण्या, शांत हो.” तेव्हा आता आजीच ओरडते आणि म्हणते, “एक मिनिट लावण्या, please शांत हो. आणि चिंटू, तू आता घरात ये, कारण असं इथे दरवाज्यात तमाशा करणं बरोबर वाटत नाहीये. त्यामुळे please तू घरात ये.” तेव्हा आजीचं ऐकून अर्णव आता आतमध्ये घरात गृहप्रवेश करतो. खरं तर त्यांचा हा लग्नानंतरचा एक प्रकारचा गृहप्रवेशच असतो, कारण ईश्वरीला अर्णवने गळ्यात मंगळसूत्र घालून, लग्न करून घरात आणलेलं असतं.

आता लावण्या त्यांच्याकडे बघतच राहते. आता आत्या म्हणते, “बस झालं. मला ना आता सहन होत नाहीये हे सगळं. सुप्रिया, डोक्यावरून पाणी चाललंय. मी आता चाललीये Police Station ला, त्या अर्णव राजे शिरकेच्या विरोधात Complaint करायला. तो काय समजतो कोण स्वतःला? अरे आमच्या काय घरातली मुलगी ही काही रस्त्यावर पडली आहे का असं तिच्यासोबत लग्न करायला? अजिबात आम्ही हे लग्न सहन करून घेणार नाही आणि हे लग्न तर आम्ही मानतच नाही.” असं आत्या बोलत असते. तेव्हा मग ती म्हणते, “सुप्रिया, मी चालले. त्या अर्णवला ना पुन्हा एकदा Police Station दाखवल्याशिवाय त्याला काय अक्कल येणारच नाही.” तेव्हा मग आता ती निघालेली असताना, आत्याला नमू थांबवते आणि म्हणते, “एक मिनिट आत्या, please जाऊ नकोस, तिथेच थांब.” तेव्हा मग आत्या म्हणते, “नाही, या वेळेला मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाहीये. सुप्रिया, तू पण लक्षात ठेव, अजिबात त्या अर्णवची बाजू घ्यायची नाहीये. अगं त्याला काय वाटतं की आपली मुलगी म्हणजे कोणी रस्त्यावर पडलेली आहे का? अगोदर अपघात घडवायचा आणि आता आपल्या घरातल्या मुलीसोबत लग्न करायचं.” तेव्हा मग सुप्रिया म्हणते, “आत्या, मला तुमचा राग कळतोय, परंतु नक्की तिकडे काय परिस्थिती होती, कोणत्या कोणत्या परिस्थितीत अर्णव हे वागलाय, या गोष्टी तर आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत ना.” तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो बरोबर आहे.

नम्रता म्हणते, “हो आई, मलाही असंच वाटतं की हे जे काही त्यांनी केलं असेल, काहीतरी विचारानेच केलं असेल ना.” तेव्हा मग जयू म्हणते, “कोणता विचार, काय विचार? ह्या लग्नाला आपला पाठिंबा होता का? मग त्याने हे निर्णय का घेतला? ते काही नाही, मी जाणारच, मी Police Station मध्ये जाणारच.” तेव्हा मग नम्रता पुन्हा तिला थांबवते.

“हे लग्न मी केलंय!” – अर्णवची कबुली

अर्णव आता ईश्वरीला आतमध्ये आणतो आणि तिला तिथे सोफ्यावरती झोपवतो. अजूनही ती बेशुद्धच असते. त्यावेळेला मग ईश्वरी बेशुद्ध असताना, तिथे अर्णव ठेवत असताना तिचं जे मंगळसूत्र असतं, ते अर्णवच्या कुर्त्यामध्ये अडकतं आणि मग ते अडकल्यामुळे सगळेजण आता बघतच राहतात. आणि अर्णवला आठवतं की कशाप्रकारे ईश्वरीला त्याने ते मंगळसूत्र घातलं होतं. खरं तर ते घातलं होतं ते मजबूरीमध्ये, परंतु ते मंगळसूत्र घातल्यामुळे अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालंय, हे आता त्याने मान्यच केलेलं असतं. ईश्वरी ही झोपेतच असते. तो हळूच मंगळसूत्र जे अडकलेलं असतं, ते आता बाजूला काढून ठेवणार असतो. अर्णव बाजूला उठणार, तेवढ्यातच लावण्याचं लक्ष तिकडे जातं. तिचे डोळे अगदी पाणावलेले असतात आणि अगदी हतबल होऊन ती त्या दोघांकडेही बघत असते. काय बोलावं हेही तिला काही सुचत नसतं, फक्त तिला त्रास होत असतो. आणि त्यानंतर मग आता इथे लावण्याला असं बघून वल्लरीला पण रागराग होत असतो. आजीही बघत असते.

फायनली त्यांचं जे मंगळसूत्र असतं, ते मंगळसूत्र त्यांच्या समोर येतं, म्हणजेच अर्णवने जे आईचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलेलं, ते सगळ्यांना आता दिसतं. आणि अर्णव आता सगळ्यांकडे बघतो आणि ते मंगळसूत्र जे असतं, ते बाजूला काढून ठेवून देतो आणि ते मंगळसूत्र तो बाजूला काढत असताना, सगळे अगदी त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. ईश्वरी आणि अर्णव यांचं नातं आता अतूट असतं, हे त्या एका मंगळसूत्राने सिद्ध केलेलं असतं. लावण्या ही खूप चिडलेली असते आणि ती रागानेच अर्णवकडे आता लांबूनच बघत असते. अर्णव ते मंगळसूत्र आता बाजूला काढतो आणि बाजूला येतो, तेव्हा सगळेजण आता अर्णवला प्रश्न विचारणार असतात आणि त्या प्रश्नांसाठी तो तयार असतो. त्यावर आता अंजली विचारते, “मला सांग चिंटू, अरे काय झालं ईश्वरीचं? तिला असा त्रास काय झालाय? आणि ती बेशुद्ध कशी काय पडली? नक्की काय झालंय, सांगशील का मला? तू हे नक्की काय होतंय?” तेव्हा मग आता तो म्हणतो, “ताई, हे बघ, ती बेशुद्ध का आहे किंवा कशासाठी, हे मी सगळं आता तुला काही सांगू शकत नाही.

परंतु इतकं नक्की सांगू शकतो की Miss इंदोर ही खूप मोठ्या Problem मध्ये अडकली होती आणि त्यामुळे तिला सोडवण्यासाठी हे पाऊल मी उचललं.” तेव्हा मग आता हे बोलत असताना लगेच लावण्या म्हणते, “Oh, म्हणजे तुला काय म्हणायचंय की इतकं सगळं घडूनही तुला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत? तुला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावीशी नाही वाटत? यार, हे सगळं तू इतका कसा काय बेजबाबदार वागू शकतोस?” तेव्हा त्यावर आता लावण्याला शांत करतच अंजली म्हणते, “हे बघ चिंटू, मला नाही आवडलं आणि जर या गोष्टी इतक्या थरापर्यंत जातच होत्या, तर तू एकदा मला Call करून सांगायचं होतंस ना की असं सगळं घडतंय.” तेव्हा मग आता वल्लरी म्हणते, “हे बघ अंजली, तू काळजी कशाला करतेस? अगं, हे जे लग्न आहे, हे आपण ग्राह्य धरू शकत नाही, कारण हे जे काही लग्न याने केलंय, हे लग्न आपण सगळ्यांसमोर केलंय का? तर नाही. एखाद्या बंद खोलीत Camera समोर असं मंगळसूत्र घालणं म्हणजे लग्न नाही म्हणत याला, आणि कोणत्याही प्रकारचं लग्न नाहीये.” तेव्हा मग आता आजी म्हणते, “हे बघ चिंटू, जे काही आहे ते खरं खरं सांग.” तेव्हा मग तो म्हणतो, “हो, हे लग्नच आहे आणि हे लग्नच केलंय मी तिच्याबरोबर.

म्हणजे माझ्या आईचं जे मंगळसूत्र आहे, ते मी Miss इंदोरच्या गळ्यामध्ये घातलंय, म्हणजे त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि या मंगळसूत्राला अर्थ आहे, माझ्या आईने तिच्या सुनेसाठी बनवलंय आणि ते आता माझ्या बायकोच्या गळ्यात आहे. त्यामुळे त्याला काहीतरी अर्थ आहे.” असं आता तो तिला बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता आजी म्हणते, “चिंटू, आता मला खरंखरं सांग, ते हे सगळं काय आहे? तू कशासाठी हा मोठा पाऊल उचललास, मोठा निर्णय घेतलास? का हे सगळं केलंस? म्हणजे कशासाठी या मुलीशी तू लग्न केलंस? तू आम्हाला सांगितलं की तुझी हळद असली तरी तुला पाठवलं, तू म्हणालास की एखाद्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही पाठवलं, पण तरीही तू आता… आता हे सगळं काय करून आलायस? तू लग्न करून आलास चक्क! आणि आम्ही हा निर्णय मान्य करावा असं वाटतंय तुला? असं कसं करू शकतोस तू?” तेव्हा मग तो म्हणतो, “आजी, करावंच लागेल कारण हे सगळं मी केलेलं आहे. मी जिच्या सोबत लग्न केलेलं आहे.”

असं म्हटल्यावर रागानेच वल्लरी आता त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव म्हणतो, “मला कळतंय की माझं चुकलंय, परंतु ज्या Situation मध्ये मी हे सगळं केलंय, त्यामध्ये जर मी हे केलं नसतं, तर Miss इंदोरचं Life Destroy होऊ शकलं असतं. म्हणूनच मी हे सगळं करतोय. आणि हो, तुम्ही जे काही प्रश्न विचारताय, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी Ready आहे. परंतु Miss इंदोरचं काय झालंय, हे मला तुम्हाला सांगता येणार नाही, कशामुळे सगळं झालेलं.” तेव्हा मग आता आजी म्हणते, “मग finally, तुझं काय म्हणणं आहे? तू या मुलीसोबत लग्न केलंस, असं म्हणायचं का तुला, की हे सगळं पोरखेळ नुसता?” तेव्हा तो म्हणतो, “नाही आजी, हा अजिबातच पोरखेळ नाहीये. मी जगासमोरही सांगितलं आणि आता घरातही सांगतोय की माझं आणि Miss इंदोरचं म्हणजेच ईश्वरीचं लग्न झालेलं आहे. आम्ही दोघांनी लग्न केलंय एकमेकांसोबत.” असं म्हटल्यावर आता सगळेजण बघत राहतात, लावण्यालाही धक्का लागल्यासारखी अगदी बघतच राहते. तेव्हा मग आजी म्हणते, “चिंटू, या सगळ्याला काही अर्थ आहे का? हे सगळं कसं वागलास तू? आणि माझ्याशी एकाही शब्दाने तुला ह्या सगळ्यावर बोलावसं वाटलं नाही? यापूर्वी तू सगळं आजीला सांगून केलंस, मग आता… आता हे सगळं का असं वागलास तू? सांग मला.” तेव्हा लावण्य म्हणते, “AR, please, please एकदा तुझ्या तोंडाने बोल की हे सगळं खोटं आहे. Please say something. Please बोल की हे सगळं खोटं आहे.

हे लग्न वगैरे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आपल्या दोघांचं लग्न होणार होतं ना यार? Please बोल.” तेव्हा मग आता अर्णव तिला बोलतो, “नाही, ईश्वरी आणि माझं लग्न झालंय हेच खरं आहे आणि हे जे तू आता काही बघतेस, तेच खरं आहे.” तेव्हा मग लावण्य म्हणते, “का केलंस हे सगळं? माझ्या आयुष्याचा पोरखेळ केलास तू सगळा! माझ्याशी लग्न ठरवलंस, सगळ्या गोष्टी ठरवल्यास, आपली हळद होती आज, तुझी उष्टी हळद माझ्या अंगाला लागणार होती ना यार? मग का केलंस असं तू? मला का आयुष्यभरासाठी असं एकटं सोडलंस तू? आणि तेही कोणासाठी? तर या मुलीसाठी, या Middle Class मुलीसाठी! ही मुलगी माझी जागा घेऊ शकते असं वाटतंय तुला? नाही, अजिबात नाही AR!” असं म्हणून ती त्याच्यावरती आता खूप ओरडत असते आणि तिचं हे वागणं सगळेजण बघत असतात. अर्णव म्हणतो, “हे बघ लावण्या, मला कळतंय की तुझी काय अवस्था आहे, परंतु please try and understand, मी कोणत्यातरी Situation मध्ये होतो म्हणून हे केलंय.” तेव्हा मग लावण्य म्हणते, “कोणती Situation यार? अशी कोणती महत्त्वाची Situation आलेली की तू इतका मोठा निर्णय घेतलास? इतक्या मोठ्या गोष्टीत तू तिच्याकडे… या गोष्टीत गेलास आणि माझा जराही विचार नाही केलास तू?” लावण्य पुढे त्याला म्हणत असते, “मी आता काय करू यार? माझ्याकडे काहीच पर्याय उरलेला नाहीये. काय करू, काय मी आता?” असं म्हणून ती वैतागत असते.

शुद्धीवर येताच ईश्वरीचा लग्नाला नकार

त्याच वेळेला इथे आता आत्याला नमू थांबवते आणि म्हणते, “थांब आत्या, please जरा तू विचार कर. तू News Channel मध्ये पाहिलंस ना, अर्णव सरांनी ईश्वरीशी लग्न केलं. त्यावेळेला ईश्वरी पण त्यांच्या बाजूला होती आणि ईश्वरी त्यामध्ये काहीच बोलत नव्हती. याचा अर्थ की तिला कोणत्याही प्रकारचा यावर Objection नव्हता. जर आपली ईश्वरी कोणत्याही बंधनात अडकलेली नाही किंवा ती ऐकणारही नाही, हे आपल्याला माहित आहे. आणि तशी Situation असल्याशिवाय ईश्वरी पण तयार झाली नसेल ना. हे… याचा अर्थ हेच आहे की आपली ईश्वरीला पण यावर काहीच आक्षेप नव्हता, तिलाही हे लग्न मान्य होतं आणि म्हणूनच ती अर्णव सरांना काहीच बोलली नाही. तिने फक्त गळ्यात मंगळसूत्र गपचूप घालून घेतलं. याचा अर्थ हाच होतो ना आत्या की इशूनेही हे मान्य केलं होतं. मग जर आपण Police Station मध्ये गेलो आणि पोलिसांनी जर विचारलं की तुला हे लग्न मान्य आहे आणि तिने ते लग्न मान्य केलं, तर मग आपण Complaint केलेल्याचा काहीच अर्थ नाही उरणार ना.

त्याचा काहीच अर्थ नाहीये. मग Police आपल्याला बोलतील की जर हे दोघेही लग्नाला तयार, तर आम्ही काहीच नाही करू शकत.” आता घरात सगळेजण गप्प बसतात, आत्याही गप्प बसलेली असते. अंजली म्हणते, “चिंटू, बोल ना, काय आहे सगळं? हे करण्याच्या अगोदर तू मला एकदा विश्वासात घेऊन सांगायला हवं होतंस ना चिंटू? काय हे सगळं? काय ईश्वरीची अशी हालत कशी झाली आहे? काय झालं हे सगळं? सांग ना मला please चिंटू. ती अशी बेशुद्ध का पडलीय आणि तू तिला Doctor कडे घेऊन गेलेलास का?” त्यावेळेला मग तो म्हणतो, “ताई, मी तुला ती अशी बेशुद्ध का आहे, ते नाही सांगू शकत. परंतु हो, Doctor कडे मी तिला घेऊन गेलो होतो आणि तेव्हाच Doctor ने मला सांगितलंय की ती बेशुद्ध आहे आणि बेशुद्ध असल्यामुळे ती थोड्या दिवसात… थोड्या वेळाने Injection घेतलंय, तर ती होईल शुद्धीवर.” तेव्हा मग आजी म्हणते, “चिंटू, मला ना हे तुझं अजिबात पटलेलं नाहीये. तू एक तर या मुलीसाठी निघून गेलास, निघून गेल्यानंतर आता सरळ इथे येतोयस आणि तू आम्हाला सांगतोयस की तिच्यासोबत तुझं लग्न झालंय. चिंटू, आम्ही या सगळ्याला कशी मान्यता द्यायची? सांग बरं. तुझं लग्न असताना या सगळ्या गोष्टी, या कशा मान्य करायच्या आम्ही?” तेव्हा मग आता मामा म्हणायला लागतो, “हे बघा, हे ना प्रकरण जरा जास्तच वाढतंय. तुम्ही please जरा शांत व्हा. आपण आपापसात शांततेत बोलून हे सगळं नीट sort करूया. Please जरा शांत व्हा.”

असं तो त्यांना सगळ्यांना सांगत असतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही तेवढ्यातच शुद्धीवर येत असते आणि त्या आवाजाच्या गोंधळाने ती उठून बसते आणि ती म्हणते, “मी कुठे आहे?” असं म्हणून ती उठून बघते, तर समोर अंजली असते. ती म्हणते, “अंजली ताई,” आणि ती उठून बसते. तेव्हा मग अर्णव तिला हात लावतो, “Miss इंदोर, are you alright?” आता पटकन ती त्याचा हात झटकते आणि म्हणते, “माझ्याकडे… माझ्या अंगाला हात लावू नका.” आणि ती अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर मग कोणालाच कळत नसतं की अशी का वागते मूर्खासारखी. म्हणजे अर्णवचं आणि तिचं लग्न झालंय, मग ही का चिडते त्याच्यावर? तेव्हा मग अर्णवला ती म्हणते, “हे काय केलंत तुम्ही सर? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? त्या एका मोठ्या Problem मधून सोडवण्यासाठी तुम्ही मला इतक्या मोठ्या संकटात कसं टाकू शकलात? तुम्ही माझ्या गळ्यात सरळ मंगळसूत्र घालून मोकळे झालात? का घातलं हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात? सांगा ना तुम्ही.” तेव्हा मग तो वैतागतो आणि म्हणतो, “Miss इंदोर, तुला समजतंय का? अगं त्या Problem मध्ये जर तू फसली असतीस, तर तुझं Life Destroy झालं असतं. कळतंय का तुला? आणि ते होण्यापासून वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतला.” ती म्हणते, “नाही. जरीही तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं ना, तरी हे लग्न मान्य नाही.”

“माझ्या बायकोला घराबाहेर कुणी काढू शकणार नाही”

तेव्हा मग आता मामी म्हणते, “काय अर्थ या सगळ्याला? अरे अर्णव, तू या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असं म्हणतोस, पण तिलाच हे लग्न मान्य नाहीये, तर मग काय करणार आहेस तू? सांग मला.” तेव्हा मामी म्हणते, “अरे काय आहे, पण मग ती जर हे लग्न मान्य करत नसेल, तर अर्थच नाहीये ना या लग्नाला.” तेव्हा आता तो म्हणतो, “नाही मामी, माझ्या आईच्या… आईने घेतलेलं तिच्या सुनेसाठीचं मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यामध्ये आता आहे, म्हणजेच त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि हे फक्त मी घालण्यासाठी म्हणून घातलेलं नाहीये. हे मंगळसूत्र हे मनापासून घातलं होतं आणि तिला वाचवण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी. त्यासाठीच हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात आहे, याचा अर्थ आमचं लग्न झालेलं आहे आणि ईश्वरी माझी लग्नाची बायको आहे.” तेव्हा ईश्वरी भडकून म्हणते, “एक मिनिट! काय हे सगळं? मी अजिबात हे लग्न मान्य करत नाहीये. तुम्ही काही बोलू नका.” तेव्हा मग वल्लरी म्हणते, “काय या मुलीचं?” लावण्या म्हणते, “एक मिनिट, जर तुला हे लग्न मान्यच नाहीये, तर मग का थांबलीस इथे? जा ना इथून.

Get out!” असं म्हणून ती हाताला धरून तिला बाहेर काढत असते. त्याच वेळेला आता बाहेर काढत असताना अर्णव तिचा हात धरतो आणि म्हणतो, “एक मिनिट लावण्या, माझ्या बायकोला असं कोणीही तिच्या घरातून बाहेर काढू शकणार नाही.” तेव्हा ईश्वरी हात झटकते आणि म्हणते, “एक मिनिट, तुम्ही please हे मला बायको बोलणं थांबवा. माझी… मी तुमची अजिबातच बायको वगैरे कोणी नाहीये. तुम्ही please मला बायको वगैरे असं काहीही बोलू नका. आलंय तुमच्या लक्षात? आणि हे लग्न मी मान्य करतच नाहीये. तुम्ही हे सगळं जे काही केलंय ना, हे तुमच्या मर्जीने केलंय. तुम्हाला असं कसं वाटलं हो की तुम्ही माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालाल आणि मी हे लग्न मान्य करेन? अजिबातच नाही, मी हे लग्न मान्य करणार नाही. आणि हा माझ्यावर झालेला साफसाफ अन्याय आहे आणि हा अन्याय मी अजिबातच सहन करणार नाही. कळलंय तुम्हाला? मी इथे अजिबातही थांबणार नाहीये. मी चालले माझ्या घरी.” असं म्हणून ईश्वरी तिथून निघून चाललेली असते आणि त्यावेळेला लावण्याला खरंच खूप बरं वाटत असतं की finally ईश्वरी आता इथून निघून जातेय आणि तिला हे लग्नच मान्य नाहीये.

ईश्वरीच्या घरच्यांचे आगमन आणि वाद

तेवढ्यातच ईश्वरी जात असताना समोरून तिला तिच्या घरातले येताना दिसतात. आता सुप्रिया, बाबा, जयू आणि नमू सगळे येत असतात. आता ईश्वरी त्यांना बघते आणि “बाबा” असा आवाज देते. तेव्हा सगळेजण तिथे येतात आणि लगेच अर्णवला येऊन जयू जाब विचारते, “काय हे सगळं अर्णव राजेश शिरके? तुला काय वाटलं, तू आमच्या मुलीशी लग्न करशील आणि आम्ही गप्प बसून राहू? का केलंस हे सगळं तू? याच्या मागचं कारण आम्हाला समजलं पाहिजे. हे असं तू लग्न करशील आणि तुझं लग्न आम्ही सहन करू?” तेव्हा मग लावण्या येऊन जयूला सुनावते, “व्वा रे व्वा! उलटा चोर कोतवाल को डांटे! अहो, तुम्हीच तुमची गरीब मुलगी आमच्यासारख्या श्रीमंत मुलांच्या गळ्यात मारायला निघालात आणि उलटं तुम्ही AR ला सुनावताय की हे सगळं त्याने केलंय म्हणून! व्वा, व्वा! खूप भारी नाटक करता तुम्ही.” आणि असं म्हणून जयूला ती आता गरीब बोलून सुनावत असते आणि तिची पूर्णपणे आता ती लायकीच काढत असते. आणि हे सगळं आता ती बोलत असताना, जयू गप्पच बसून जाते, कारण लावण्याने अगदी व्यवस्थितपणे तिचा माजच उतरवलेला असतो. आणि हे सगळं जेव्हा लावण्या बोलते, तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप राग येत असतो आणि ती रागानेच आता तिच्याकडे बघत असते.

पुढील भागात: संजय देणार अर्णव-ईश्वरीच्या नात्याला साथ?

पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ईश्वरी म्हणते, “हे अर्णव राजे शिर्के, तुम्हाला असं वाटत असेल की हे लग्न तुम्ही केलंय, त्याला मी मान्यता देईन? नाही. हे फक्त लग्न तुम्ही तुमचा ego satisfy करण्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे हे लग्न मी अजिबातच मान्य करणार नाही आणि ह्या लग्नाला मी आता मान्यताच देऊ शकत नाही.” अर्णव म्हणतो, “Miss इंदोर, तुला माहितीय हे लग्न कोणत्या परिस्थितीत केलंय म्हणून. त्यामुळे please तू असं बोलू नकोस.” तेव्हा ईश्वरी म्हणते, “नाही, अजिबात नाही. मला काहीच माहिती नाहीये. हे लग्न मी मान्य करू शकत नाही, कारण माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशजींच्या लग्नाची स्वप्नं पाहिली होती आणि त्यामुळेच माझं लग्न हे राकेशजी बरोबरच होणार आहे, तुमच्या सोबत नाही. आणि तुमच्या सोबतचं लग्न मी मान्य करत नाही.” आणि मग ती म्हणते, “बाबा, हे जे लग्न आहे, अर्णव राजे शिरकेचं, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मी तुमच्या मनाविरोधात मिरवू शकत नाही. माझं लग्न तुम्ही ठरवलेलं तसंच होणार.” आणि मग ती गळ्यातलं जे मंगळसूत्र असतं, ते काढत असते. आणि ते मंगळसूत्र काढत असताना आता पटकनच तिचा हात संजय धरतो आणि तिला थांबवतो. तर आता संजय स्वतः ईश्वरीच्या आणि अर्णवच्या लग्नाला मान्यता दिल्यानंतर नेमके पुढे काय घडणार आहे, हे पाहणं रंजकतेचं ठरेल.

Leave a Comment