Muramba 11 September 2025 Written Episode Update: Akshay and Rama’s Play Succeeds; Iravati Plots a New Scheme

Muramba 11 September 2025 Written Episode Update: Akshay and Rama’s Play Succeeds; Iravati Plots a New Scheme

Food Order वरून घरात गोंधळ

नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया, हॉलमध्ये आजी आणि आरोही काहीतरी मोबाईलवर बघत असतात. त्यांचं आपलं आपलं काहीतरी असं चाललेलं असतं. तिथे तारा येते आणि पार्थ येतो. त्यांनी त्यांना जे हवंय ते Food Order केलेलं असतं, पण Home Delivery येतच नसते. खूप Try केलेले असतात, खूप वेळा फोन केलेला असतो, पण ती Delivery अगदी Cancelच होत असते. ती का Cancel होते, हे दोघांनाही कळत नसतं. आता ते आरडाओरडा करतात आणि इरावतीला हॉलमध्ये बोलवतात. ती म्हणतात, “अगं, इतकी भूक लागली आणि Food Delivery येतच नाहीये. नेमकं काय झालं असेल?”

Muramba

अक्षयचा नाट्यमय प्रवेश

आता त्यांना इरावती काहीतरी उत्तर देणार, तेवढ्यात अक्षय घरातली भांडी वाजवत, अगदी जोराजोरात अशी भांडी वाजवत नाचत आलेला असतो. या सगळ्यांना कळतच नाही, एक्झॅक्टली हे अक्षयचं चाललंय तरी काय. अक्षय येतो, अक्षय म्हणतो, “हे सगळं काही मी केलं. मी तुमची Order Cancel केली, तुम्ही सगळ्यांनी हॉलमध्ये एकत्र यावं म्हणून. बसा बसा.” जबरदस्तीने त्याने अगदी इरावतीसहित सगळ्यांना हॉलमध्ये बसवलेलं असतं. “बसा रे आणि पाच मिनिटं फक्त. लगेच नाटक सुरू होणार आहे आणि तुम्ही Compulsory बसायचंय.” अक्षय म्हणतो, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार, पार्वती आणि गणपतीची.” तेवढ्यात आपला गणपती आलेला असतो.

Sadhi Mansa 09 september 2025 full written episode update

पार्वती आणि गणपतीची गोष्ट

तो येतो आणि अक्षयच्या समोर उभा राहतो. गणपती बाप्पा आलेले असतात, गोलमटोल असे गणपती बाप्पा आलेले असतात. “बघितलं? हे गणपती बाप्पा. असले असले गणपती बाप्पा,” आपले हात करून अक्षय दाखवतो, “की असे जाडे गणपती बाप्पा. यांच्या तब्येतीमुळे त्यांना खेळायलाच कोणी घ्यायचं नाही. त्यांचा भाऊ सुद्धा नाही, कार्तिक. तो म्हणायचा, ‘तू खेळू नको. तू लठ्ठ आहेस. तू आमच्याबरोबर खेळू शकत नाही.’ मग गणपती बाप्पांना यायचा कंटाळा आणि करायचे राग राग. गणपती बाप्पा झाले नाराज. प्रत्येकाला म्हणायचे, ‘मला खेळायला घ्या, मला खेळायला घ्या.’ पण कोणी खेळायलाच नाही घ्यायचं. मग ते आपले नाराज झाले आणि बसले एका जागेवर. ते रुसलेही होते आणि फुगलेही होते.”

आता मात्र गणपती बाप्पाची खरंच वाईट अवस्था झाली. एकही त्यांना मित्र शिल्लक नव्हता. गणपती बाप्पाला मिळाली मांजर. त्यांच्या जवळ येऊन बसली. मग त्यांची झाली Friend. “व्वा! आता मांजरीशी मी खेळू शकतो आणि माझा वेळ छान जाऊ शकतो.” गणपती बाप्पा त्या मांजरीचे कानच पिरघळतात. मग तिला दुखायला लागतं. ती ओरडायला लागते, रडायला लागते. मग असं होतं, ती बिचारी रडते रडते आणि गणपती बाप्पा जवळून खूप दूर अशी पळून जाते. ते परत एकटे पडतात. आता कोणच नाही त्यांना खेळायला. ते जातात घरी. आता कोणी खेळायला नसतं, मग बिचारे आता घरी जातात.

मग घरी गेल्यानंतर काय होतं? पार्वती देवीच्या समोर गणपती उभे राहतात. जेव्हा रमा आलेली असते पार्वतीचं रूप करून, असली काय सुंदर दिसत असते की ती आली की अक्षय बोलायचं बंद होतो आणि सारखी नजर त्या रमावर टिकलेली असते. आता सगळ्यांच्या हे लक्षात येतं की अक्षय फक्त रमाकडे बघतोय आणि बोलायचा थांबलाय. रमा आता अक्षयला डोळ्याने खुणावते, “समोर आहे सगळे.” आता पटकन तो भानावर येतो. “हो, गणपती बाप्पा घरी पोहोचल्यावर पार्वती आई म्हणतात, ‘तू मांजरीचे कान का ओढले? मांजर आली होती ना तक्रार करत माझ्याकडे की तुमच्या गणपती बाप्पाने, तुमच्या गणूने माझे कान ओढले. का ओढले रे? का तिला त्रास दिला? तिला किती त्रास झाला असेल, किती वेदना झाल्या असतील, कल्पना आहे का तुला?'”

गणपती बाप्पा डायरेक्ट म्हणतात, “नाही आई, मी काहीही केलेलं नाहीये. मी कान ओढले नाही, तिला त्रास दिला नाही. खरंच मी काही केलं नाही.” गणपती बाप्पा खोटं बोलतात. ओरडले नाही, काही नाही, काही नाही. गणपती बाप्पाला काही बोलल्याच नाहीत. अगदी शांत. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. मांजर आलं खेळायला. गणपती बाप्पा खेळे खेळे, परत तिला त्रास दिला आणि रडायला लावली. परत तेच. बिचारीचे इतके कान ओढले, इतके कान ओढले की ती आता रडत रडत रडत परत बिचारी पळून गेली.

गणपती बाप्पा तर नाराज झाले की परत मांजर पळून गेली. “मी तिला त्रास दिला आणि ती पळून गेली.” हो, ते आता नाराज झाले. नाराज झाले, पण कोणी काय खेळायला तयारच नाही. यांच्यामध्ये अशी खोड होती की हे खोटंही बोलायचे आणि त्यांची खोडीही काढायचे आणि खोटं बोलत असल्यामुळे यांच्याशी कोणी काही खेळत नव्हतं. मग ते घरी जाऊन डायरेक्ट पार्वती आईला म्हणाले. गणपती बाप्पा पार्वतीला म्हणतात, “तुझे कान लाल का झाले?” “अरे बाळा, तुझ्या सोबत खेळायला कोणी नसतं, मग मी मांजरीचं रूप घेऊन तुझ्याशी खेळायला आले आणि तुझं रूप घेऊन दुसरंच कोणीतरी आलं होतं. असले काय त्या मांजरीचे कान ओढले, कान ओढले की इतके लाल झालेत बघ माझे कान. पण तो गणपती तू नव्हता, दुसरा कोणीतरी होता. तो खोटं बोलला ना, कान ओढले नाही म्हणून? मग बघ कसे कान लाल झाले. तू नाही ओढणार, मला माहिती आहे. तो दुसरा गणपती बाप्पा होता, कारण तू खोटं बोलणार नाही आईशी. मला माहिती आहे.”

यांचं हे जे नाटक चाललेलं असतं, ते घरातल्या कोणालाच आवडत नसतं. फक्त आरोहीला आणि आजीला, दोघींनाच आवडत असतं. बाकी या तिघा-चौघांचे चेहरे अगदी फुगलेले असतात. अजिबात त्यांना Interest नसतो आणि सगळं काही Boring वाटत असतं. त्यांना त्यांच्या Room मध्ये जाऊन मोबाईल बघायचा, कोणाला Game खेळायची, कोणाला काय काय, आपली आपली अशी त्यांना कामं असतात. त्यांना अजिबात या गोष्टीमध्ये Interest नसतो.

आरोहीचा भावनिक कबुलीजबाब

आता गणपती बाप्पाला चूक कळाली होती की आपण खोटं बोललो आणि आपलं खोटं बोलणं किंवा चोरी करणं हे आईने पकडलंय. गणपती बाप्पा इतके नाराज झाले. “यामुळे आपल्याकडे कोणी येत नाही,” हे त्यांच्या लक्षात आलं. पटकन ते खाली बसले, कान पकडले. “आई, मला माफ कर. मांजरीचे कान मीच ओढले होते आणि तुझ्याशी खोटं बोललो की मी ओढलेच नाही. पण खरंच चूक झाली माझी. मी इथून पुढे असं काही करणार नाही आणि दुसऱ्याला त्रास तर मी अजिबात देणार नाही.” गणपती बाप्पाने स्वतःची चूक कळाल्यावर अगदी कान पकडून स्वतःची चोरी किंवा स्वतः जे खोटं बोलले, ते कबूल केलेलं असतं आपल्या आईसमोर.

आणि हे सगळं आता झालं. आता पार्वती आई गणपती बाप्पाला जवळ घेतात आणि प्रेमाने समजून सांगतात. “आई-बाबांशी कधीही खोटं बोलायचं नाही. जर काही चुकीचं केलं असेल, तर ती लगेच त्यांना सांगून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. त्यावर आई-बाबा काहीतरी विचार करतात, काहीतरी सुचवतात आणि परत असं होऊ नये, करू नये म्हणून काहीतरी आपल्याला मार्ग दाखवतात. तेव्हा आई-बाबांशी ते चुकूनही खोटं बोलायचं नाही. कळतंय का बाळ गणेश?”

आता हे जे काही चाललंय, ते इरावती, मालविका यांच्या लक्षात आलेलं असतं. काल जे खोटं बोलली किंवा आरोहीने जी खोटी चोरी केली आहे, ती चोरी तिने कबूलच केली नाही आणि रमाला तोंडावर पाडलं की मी चोरी केलीच नाही. आणि हे सगळ्यांच्या समोर सत्य यावं किंवा आरोहीला कळावं की चोरी करणं चुकीचं असतं, खोटं बोलणं चुकीचं असतं, हे करूच नये, हे करण्यासाठी तिने हा सगळा काही Drama केलेला असतो, रमा आणि अक्षयने. आणि बिचारी अर्था, तिघांचा Drama अगदी Successful होताना दिसत असतो कारण आरोहीला खरंच वाईट वाटत असतं.

आता इरावती आणि मालविका मात्र घाबरलेल्या असतात. “रमा एक पाऊल पुढे निघाली आणि नको ते केलं. ऐनवेळेला Drama सादर केला आणि सगळ्यांना Emotional Blackmail केलं हिने.” आणि बिचारी आरोही लहान असते, जे समोर दिसतं त्याच्यावरच ती विश्वास ठेवणार आणि आताही तेच झालेलं असतं. आरोही लगेच विश्वास ठेवते, “आईने जे सांगितलं ते बरोबर आहे,” आणि आता ती थोडीशी अशी कावरीबावरी होऊन रडायला लागलेली असते. “आता मी काय करू आणि काय नाही?” अशी तिची अवस्था झालेली असते. “मी तर खोटं बोलले आणि मी चोरीही केली होती.”

“मग आता मी काय करू? सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्या आई-बाबांना होतो. शिक्षाही भोगावी लागते, त्रासही होतो. करतं कोण? तुम्ही लोक. आणि त्रास कुणाला होतो? आई-बाबांना. त्यांच्याशी खोटं बोलता. ते चांगलं सांगत असतात ना, ‘हे करू नको, ते करू नको.’ तुमच्या भल्यासाठी सगळं काही ते सुचवत असतात, पण तुम्ही ते मान्य का करत नाही?” आई अगदी प्रेमाने त्या गणपती बाप्पाला जवळ घेते आणि माफ करते. खूप प्रेमाने असं आईने समजून सांगितलेलं असतं. “खोटं बोलायचं नाही आणि चोरी करायची नाही. आई-वडिलांना त्रास होतो आणि सगळं काही सहन करायला लागतं आई-वडिलांना. त्यामुळे बाळा, लक्षात ठेवायचं रे. आई-वडिलांवर आपण इतकं प्रेम करतो, मग त्यांना त्रास झालेला आवडणार आहे का? मग खोटं का बोलायचं त्यांच्याशी? असं का वागायचं?”

आता हे सगळं काही आरोहीच्या लक्षात आलेलं असतं. जो काही Drama झालाय, बरोबर तिने तो Capture केलेला असतो आणि अक्षय आणि रमा अर्थात ज्या हेतूने हे केलेलं असतं Drama, तो बरोबर त्यांचा हेतू अगदी साध्य झालेला असतो. आरोहीचे डोळे उघडावे, तिला सत्यता कळावी, खोटं बोलणं वाईट असतं, चोरी करणं वाईट असतं, ते करू नये आणि जरी चूक झाली तर ती आई-वडिलांच्या समोर येऊन कबूल करावी आणि माफी मागावी, हे आता बरोबर आरोहीच्या लक्षात आलेलं असतं.

आरोहीच्या चेहऱ्यावरून तर कळत असतं की सगळं काही तिला कळालं. आता आरोही बरोबर एकटक त्या तिघांकडे बघत असते. नाटक वगैरे रमा बोलते बोलते आणि अचानक डोळे झाकून ती खाली पडायला लागलेली असते. अक्षयचं लक्ष रमाकडे जातं आणि पटकन तिला सावरलेलं असतं. “रमा, तोंड उघड. रमा, बोल.” असं म्हणता म्हणता रमाने अगदी डोळे मिटलेले असतात आणि काही Response ती देत नसते. आरोही आता रडायला लागलेली असते. रडत असते, खूप घाबरलेली असते. “आई, डोळे उघड. आई, डोळे उघड.” आणि आता रडत रडत ती बोलायला लागलेली असते. रमाकडे मात्र डोळे मिटलेले असतात आणि अक्षय खूप असा घाबरलेला असतो. आरोही म्हणते, “आई, Sorry. तू उठ. मी पैसे घेतले होते. मी चूक कबूल करते. माझी चूक झाली. मी पैसे घेतले, चोरी केली. पण तुझ्याशी मी खोटं बोलले. खरंच आई, मला माफ कर. पण तू डोळे उघड. मी आजपासून कधीच तुझ्याशी खोटं बोलणार नाही आणि चोरीही करणार नाही. आई, Please तू डोळे उघड.” आरोही इतकी घाबरलेली असते, रडायला लागलेली असते. जोरात “आई, आई” असं ओरडते आणि काय खरं आहे, सगळ्यांच्या समोर तिने सांगून टाकलेलं असतं.

मालविकाची घाबरगुंडी आणि इरावतीचा नवा डाव

आता मात्र सगळा नाटकावरचा पडदाच निघालेला असतो आणि सत्य काय ते सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आता मात्र मालविकाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते आणि Bedroom मध्ये येऊन एका मिनिटात अशी Bag भरायला घेतलेली असते तिने. “हे बघा, आता मी Bag भरायला घेणार कारण नाटकावरचा पडदा निघालेला आहे. सत्यता सगळ्यांच्या समोर आली. आरोही आता जाणार तिच्या आई-वडिलांना सगळं खरं खरं सांगणार आणि मी काय, हे सगळ्यांना कळणार. इथे राहण्यात किंवा इथे आता खपण्यात काही एक अर्थ नाहीये. कळतंय का? तुमच्या नादाला लागले आणि मी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. नको ते कांड करायला गेले आणि शेवटी तोंडघशी मीच पडले. सगळं काही केलं तुम्ही, आता माझं नाव ती सांगणार तिच्या आई-वडिलांना की मालवीने मला खोटं बोलायला लावलं होतं. सगळं काही तुम्ही केलंय Mam आणि आता सगळ्यांच्या समोर मी येणार आहे. हे असं का? हे चुकीचं आहे ना. आणि मी सगळा Blame स्वतःवर घेणार नाही. त्यामुळे माझी माझी मी Bag भरतीय आणि इथून मी चालली. तुमचं तुम्हाला काय करायचं आहे ना, तुम्ही करा. I don’t care. मी चालली आता. आणि हो, फार छान मदत केली तुम्ही. या, खरंच खरंच आवडलं मला. खूप छान माझी मदत केली इथे. आणि हो, आता ती रमा आहे ना, तुम्हाला आणि मला असला काय डिचका देणार आहे ना की आता बघतच. अशी काही जिरवेल ना ती की नाही, अख्या महाबळेश्वरमध्ये धिंड काढली ना तर याद राखा.”

“हे बघ, पैसेही लागत नाही आणि वेगळी बुद्धीही लागत नाही. बरोबर मनापासून इच्छा लागते चांगलं बोलायला. कळतंय तुला? Positive, Positive.”

तारा आणि पार्थ आलेले असतात. आधीच इरावती चिडलेली असते, सगळं काही तिच्या डोक्यावरून गेलेलं असतं. “Granny, आजी… Granny, आजी, आता काय बोलू? सगळ्या Food Delivery Cancel केल्यात आणि कुठलंही Food बाहेरून येणार नाही असं सांगितलंय.” “व्वा! काय छान.” “तारा, पार्थ, हे कोणी केलं बाळा?” “सगळं काही रमाने केलंय आणि रमानेच आमचं खाणं-पिणं बंद केलंय. आल्यापासून अगदी आमच्या मागे लागलीय. आमच्या मोबाईलच्या काय मागे लागली, Net काय बंद करते, आता तर आमचं खाणं-पिणंच बंद करून टाकलंय. का त्रास देते ही रमा आम्हाला? तिचा आणि आमचा काय संबंध? आणि मुळात तिचा काय संबंध इथे येऊन राहण्याचा आणि आम्हाला शहाणपणा शिकवण्याचा? Granny, ती कोण आहे आणि का करू शकते असं? तिला काय अधिकार आहे आम्हाला असा त्रास देण्याचा? आणि हे बघ, आम्ही हे सहन करणार नाही.”

इरावती म्हणते, “मला काय माहिती ती कोण आहे, काय? आणि हे बघा, तिने कशासाठी केलं, का म्हणून केलं, मला खरंच माहीत नाहीये. जायचं आणि डायरेक्ट तिला सरळ विचारायचं. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिने केलंय म्हटल्यावर तीच देऊ शकते ना. बरोबर आहे ना? मग जा की. इथे माझ्या डोक्यावर बसण्यापेक्षा, सरळ तिला जाऊन विचारा की, ‘बाई, तू का केलं असं? तुला काय त्रास होतो आमच्यापासून म्हणून की आमचं खाणं-पिणंच बंद केलं?’ जा, दोघेही जा आणि डायरेक्ट तिला विचारा. नाही, तिला विचारू शकत, नवऱ्याला विचारा. तिचा नवरा देईल की तुम्हाला उत्तर. जा तुम्ही दोघं. गेलं, उत्तर विचारलं की ती घाबरणार आणि बरोबर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. अरे जा रे तुम्ही दोघं. तिचा नवरा तर उत्तर देऊ शकतोस ना. जा, काका तर तुमचा आहे ना. जा, त्याला जाऊन विचारा. लगेच सांगेल तो, का आणि कशासाठी केलंय सगळं. जावा जावा, ठणकावून जर विचारलं तर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुमचा Problem सुद्धा Solve होईल. पार्थ आणि तारा, दोघा जणांनी जा आणि Please त्यांना प्रश्न विचारून या.”

इरावती अजिबात त्या मुलांच्यासमोर वाईट वागत नसते किंवा वाईट ठरत नसते. अगदी गोड गोड, छान छान अशी वागत असते. खायला प्यायला देते, मोबाईल बघायला देते, Net बघायला देते, ताराला Modelling करून देते, हवे ते पैसे देते, हवे ते कपडे देते. काय हवंय ते सगळं काही पुरवत असते. फक्त सगळ्यांना, म्हणजे मुकादमांची पिढी पूर्ण बरबाद करायची हाच तिचा ध्येय असतो आणि ध्येय साध्य करण्यासाठी इरावती कुठल्याही थराला जायला तयार असते. पार्थ आणि तारा तिने Already बिघडवलेले असतात. आता फक्त आरोही आणि अर्था राहिलेल्या असतात बिघडायच्या आणि त्याच मार्गाला ती लागलेली असते. अर्था बिचारी खूप गरीब असते आणि या सगळ्यांना ती घाबरून राहत असते. अगदी एखाद्या भीतीमध्ये ती जगत असते. ती वर मानही करत नाही आणि काही बोलण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळे फक्त आरोही राहिली. आता आरोहीला बिघडवलं, वाईट वाळणाला लावलं की इरावतीचं ध्येय साध्य होणार असतं आणि मुकादम एकदाचे बरबाद झाले की ती आपली आपली परत निघून जाणार असते. त्यासाठी सगळा काही खटाटोप करत असते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास देत असते आणि लहान मुलांना बिघडवण्याच्या मागं लागलेली असते.

घरात नवं वादळ

आता मात्र तिच्यापुढे अजूनही तारा आणि पार्थ उभे असतात. “आम्ही करायचं काय?” ती म्हणते, “आता शेवटचं सांगतीय, अक्षयकडे जायचं किंवा त्या रमाकडे जायचं. आमचं खाणं-पिणं बंद का केलं किंवा आमच्यावर बंधनं का घालताय, याचं उत्तर आम्हाला द्या. डायरेक्ट जायचं आणि डायरेक्ट प्रश्न विचारायचा. घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. तुम्ही काय चोरी केलेली नाहीये किंवा काही गुन्हा केलेला नाहीये. खाण्याच्याच गोष्टी मागवल्यात, त्यात लपून ठेवण्यासारखं किंवा येऊच नको असं सांगण्यासारखं काय? तुम्ही जा आणि आत्ताच्या आत्ता त्या अक्षय-रमाला प्रश्न विचारून या. अरे जा, माझं तोंड बघण्यापेक्षा त्यांना जाऊन विचारलं तर Problem Solve झाला असता. लगेच निघा. रमालाही विचारा खडसावून आणि अक्षयला सुद्धा मोठ्या आवाजात. Go.”

इकडे आता रमाला स्वतःच्या हाताने आरोही जेवण भरवत असते. “आई, I am Sorry. खरंच चूक झाली. आजपासून कधी खोटं बोलणार नाही मी. चोरीही करणार नाही आणि तुझ्यापासून आणि बाबांपासून काही एक लपवणार नाही. जी गोष्ट वाईट आहे, ती वाईट आहे. मला कळालं नाही ही गोष्ट वाईट आहे. मी कधीच करणार नाही.” आता माय-लेकींचं चांगलंच सूत जमलेलं असतं आणि प्रेमही होत चाललेलं असतं. अक्षय आजीला घेऊन बाजूला उभा असतो. आजी म्हणते, “बघितलं का अक्षय? धाक, मारझोड करून मुलांना कधीही वळण लागत नाही. प्रेमाने, अगदी जवळ घेऊन किंवा आपुलकीने समजून सांगायला गेलं तर सगळं काही व्यवस्थित होतं. आणि आताही तेच झालंय. रमाने बघ, Drama केला आणि नकळतपणे तिला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले. तिला तिची चूक कळाली आणि आता स्वतः होऊन कबूल झाली तिने काय केलं होतं. आणि तुझ्याही लक्षात आलं, मगाशी रमा खोटं बोलत नव्हती. काय खरं आणि काय खोटं तुला कळालंय ना? उगाचच तिला पाठीशी घालण्यात आणि रमाला रागवण्यात काही अर्थ नाही. अक्षय, कधी कधी सत्यता काय, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करत जा. आपल्याला समोर दिसतं तेच सत्य प्रत्येक वेळेला खरं नसतं. कळालं का?”

अक्षय, रमा आता आरोहीला अजूनही समजून सांगत असते, “कितीही मोठा मोठा Problem असू दे, कितीही मोठी चूक होऊ दे, जे काय असेल ते पहिल्यांदा आई-बाबांशी बोलायचं, त्यांना सांगायचं. त्याच्यावर Solution काढणारे असतात ते आई-बाबाच. खोटं बोलून लांब पळून प्रश्नाचं उत्तरही मिळत नाही आणि Solution ही नाही. कळालं बाळा?” “हो आई, मी चूक केली, मी मान्य करते. इथून पुढे मी नाही करणार आहे चूक.” आजी म्हणते, “आरोही बाळा, तू जे केलं, तू जे वागली, तुला कोणी करायला लावलं होतं किंवा हे चांगलं असतं असं कोणी शिकवलं?” रमा म्हणते, “आजी, जाऊ दे ना. तिला Realize झालंय ना? उगाच कशाला गोष्टी लांबवायच्या, याचं त्याचं नाव घ्यायचं आणि उगाच त्रास करून घ्यायचा? असू दे. तिला कळालंय ना? असू दे.”

“थांब आई, मी आले.” आरोही आता काहीतरी आणायला बाहेर गेलेली असते. तिच्याकडे Bag मध्ये खूप साऱ्या Pencil, Eraser असतात. ते प्रत्येक वेळेला तिने School मधून आणलेलं असतं. आता हे सगळं काही रमाच्या पुढे दाखवते. “माझ्या Friend कडून आणलं होतं सगळं हे चोरून मी, पण त्यांना परत देणार आणि Sorry म्हणणार. इथून पुढे मी कधीच करणार नाही.” रमा अगदी प्रेमाने तिला जवळ घेते. आरोहीने आता रमाचा आणि अक्षयचा हात एकमेकांच्या हातावर ठेवलेला असतो आणि अगदी जवळ बसवलेलं असतं. त्यांची Family तिने Complete केलेली असते. आज तिघांना बघते आणि म्हणते, “सुंदर, गोड कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी मीच आहे नालायक. इरावतीच्या नादी लागले आणि या गोड दांपत्याला मी वेगळं केलं. पण आता यांना एकत्र आणण्यासाठी जे काय करता येईल ते मी नक्कीच करणार आहे.” अक्षयने हात हातात घेतलेला असतो रमाचा आणि रमाला काहीतरी वेगळंच Feel होत असतं. खूप छान असं तिला वाटत असतं आणि ती सारखी त्या अक्षयकडे बघत असते.

तारा आणि पार्थ इतका आरडाओरडा करतात, “मामा बाहेर ये, मामा बाहेर ये.” अक्षयही रागारागाने बाहेर आलेला असतो. “काय, काय एवढा आरडाओरडा चाललाय आणि काय हवंय गं?” “मामा, त्या रमाला अगदी तिच्या Limit मध्ये राहायला लावायचं. या एरियातल्या सगळ्या Food Delivery तिने Cancel केल्या आणि इथे कुठलंच Food Order होणार नाही, असंही तिने केलंय. ती सगळ्याची मालकीण आहे म्हटल्यावर सगळ्यांना नाही चालू शकत. ती आमची मालकीण नाहीये, फक्त या Property ची मालकीण आहे. तिला सांगायचं, आम्हाला शहाणपणा शिकवायला जायचं नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला माहितीये, त्यामुळे आम्हाला सुधारायला अजिबात जायचं नाही. तिचा आणि आमचा काही एक संबंध नाहीये. तुम्ही सांगायचं समजून, कळतंय का मामा? ती इथे नव्हती आणि ती आल्यापासून सगळे ड्रामे व्हायला लागले. सात वर्ष नव्हती, कसली आली इथे? काय काम आहे?”

“तारा, Limit मध्ये बोलायचं आणि आवाज कमी ठेवायचा.” पार्थ म्हणतो, “हे बघ काका, तिच्याकडे काम करतो त्याचा त्रास आम्हाला नको. तर पूर्ण सोडून आम्ही इथे राहतोय ना, मग तिने आमच्यावर शहाणपणा करायचा नाही.” अक्षय म्हणतो, “लहानाचं मोठं करताना मलाही त्रास झाला. तुमच्या आई-वडिलांना जाऊन विचारा की का सोडून गेले.” तारा म्हणते, “ए, तू तर मोठी होतीस. विचार की. मामा, आता बायको आली तर आम्हाला विचारणार आहे का? प्रश्नाने आमच्या आई-वडिलांना कसं खोटं ठरवणार आहे का तू? त्यांनी कसं वाईट वागले, कसं आम्हाला सोडून गेले? याच्या आधी आम्हाला सांभाळलं. एक दिवस झाला बायको येऊन, तर लगेच तिच्यासारखं बोलायला लागला. आरोहीच्या वेळेला कुठे होती ती? पाचगणीमध्ये मजाच करत होती ना ती. कुठे होती? विचार की तिला.” अक्षय लगेच तिच्यावर हात उचलतो आणि मारायला लागलेला असतो, पण स्वतःला सावरतो. “मामा, रमासाठी माझ्यावर हात उचलणार आहे?”

“Sorry, Sorry तारा.” “काय केलंस अक्षय? बाप्पासमोर मुलांना मारतोस?” “Sorry, Sorry, चूक झाली माझ्याकडून.” इरावती म्हणते, “आत्या, रमासाठी आपल्या मुलांवर हात उचलला अक्षय? हे चुकीचं आहे.” ती आता हसत असते जो काय तमाशा झालाय त्याबद्दल.

आरोहीला बिघडवण्याचा कट

पार्थ म्हणतो, “मला तसंच वाटतंय, घर सोडून निघून जावं.” तारा म्हणते, “मलाही घरात थांबावंसं वाटत नाहीये. आपण खरंच इथून निघूनच जाऊया.” इरावतीने काय Food Order केलेलं असतं. बापरे! त्यांच्या आवडीचं सगळं काही मुद्दाम आणलेलं असतं. इरावती म्हणते, “कुठे निघून जाणार आणि काय निघून जाणार? काही एक संबंध नाही. सगळ्यांनी इथेच राहायचं. मी आहे ना, Granny. तुम्ही जाण्याची गरज नाहीये. चूक कोणाची आहे? त्रास कोण देतंय? ती. मग तिने गेलं पाहिजे ना घराच्या बाहेर? तुम्ही का जाणार? तुमचे आई-बाबा तुम्हाला सोडून गेले तर तुमची काय चूक आहे? कळतंय का? शांत बसायचं. तिने घराच्या बाहेर जायचं. यासाठी आपल्याला एकत्र येऊन लढाई जिंकायची आणि आरोहीला आपल्या बाजूने करायचं, तरच आपण लढाई जिंकू शकतो. कळतंय का मुलांनो? आरोहीला पटवून द्या तुम्ही किती चांगले आहात. आरोही बरोबर तुमच्या बाजूने वळणार. थोडी बिघडली तर काय हरकत आहे? बिघडली तर बिघडली.”

कुणाला Pizza आणलेला असतो, कुणाला Burger आणलेलं असतं. मुद्दाम सगळ्यांना हवं ते इरावती आणून देत असते आणि त्यांना बिघडवत असते. आता आरोहीला बिघडवायचं एवढंच काय त्यांचं ध्येय असतं आणि सगळेच्या सगळे कामाला लागलेले असतात. काही झालं तरी आरोहीला बिघडवायचं. तिघांनी मिळून आता प्लॅन केलेला असतो, “काही झालं तरी आरोहीला बिघडवायचं म्हणजे बिघडवायचंच. ती बिघडली पाहिजे. म्हणजेच अक्षयचं आणि रमाची आता जिरणार.” आता आरोहीला त्यांनी Game च्या नादी लावलेलं असतं. “आणि Game खेळणं चांगलं असतं. जिंकलं की खूप मजा येते, खूप छान वाटतं. तू खेळून तर बघ.” आता तिला Game खेळायला लावलेलं असतं. आता तारा म्हणते, “अगं, आपण Reel करूया. पार्थ, Shoot कर रे.” आणि डान्स करत असते, Reel करत असते आणि आरोहीलाही अगदी तसंच करायला लावते. आरोहीला काय, समोर जे दिसतंय ते छान आहे, तिला खरंच मज्जा येत असते. बरोबर ठरवल्याप्रमाणे आरोहीला दोघेही आता बिघडवत असतात. आरोहीला आता Game खेळायच्या नादी लावलेलं असतं पार्थ आणि ताराने. हा भाग इथेच संपतो.

पुढच्या भागात…

 भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. रमा झोपेतून उठलेली असते आणि तिच्यासाठी अक्षयने चहा आणून दिलेला असतो. “उठलीस तर आधी चहा पिऊन घे, मग तू Fresh व्हायला जाऊ शकतेस.” ती म्हणते, “कशाला? काय गरज होती?” “आता आणलाय ना, तर पी चहा.” अक्षयने रमासाठी चहा आणला, यामुळे रमाला खूप छान वाटलेलं असतं. अक्षय म्हणतो, “इथून जायचं. इथून जायचं.” “का जायचं? कारण सांगा. मी लगेच जाणार. कारण सांगितल्याशिवाय मी काय इथून जात नसते.” “जायचं म्हणजे जायचं. तुम्ही जेव्हा कारण सांगाल, तेव्हा मी लगेच निघून जाणार.”

“तुझ्यामुळे तारा आणि पार्थ चिडले आणि तुझ्यामुळे तारा आणि पार्थ यांच्यावर मी हात उचलला.” अक्षयने डायरेक्ट सांगितलेलं असतं की, “तुझ्यामुळे माझी माणसं तुटलेली मला चालणार नाहीये. मला त्यांच्यापासून वेगळं व्हायचं नाहीये. आणि हो, आरोहीला भेटायचं ना तुला? शाळेत भेट. काय धमाल करायची ती कर. घरी यायचं नाही, इथे राहायचं नाही किंवा इथल्या लोकांना काही एक शहाणपणा शिकवायला जायचं नाही. तू तुझं तुझं जग आणि मला माझं माझं जगू दे. राहिला प्रश्न आरोहीचा. तिला भेटण्यापासून, खेळण्यापासून मी तुला रोखणार नाही किंवा थांबवणार नाही. तुला हवं तेव्हा भेटत जा, हवं ते करत जा. फक्त, फक्त तू माझ्या घरात राहू शकत नाही.” एवढंच काय. रमा ही हट्टी असते. रमा म्हणते, “जोपर्यंत कारण कळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही.” आता बघूया रमा काय करते आणि परत तिथेच राहते पार्थ, तारा आणि आरोहीला नीट करण्यासाठी. हे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला.

Leave a Comment