सोहमच्या वागण्याने अद्विक अस्वस्थ
‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला, सोहमने केलेला अपमान आणि “तू माझा सखा भाऊ नाहीस” या त्याच्या बोलण्याने अद्विकला खूप त्रास होत असतो. तो रडत त्याच गोष्टीचा सारखा विचार करत असतो. अशातच त्याला कला आपल्यासोबत असल्याचा भास होतो. ही भासातील कला त्याला समजावते की, “शांत बस, रागाच्या भरात बोलला असेल. अरे लहान आहे तो, एवढा मोठा आहे का तो विचार करून बोलायला? आपण त्याला समजून घ्यायचं नाही तर कोणी घ्यायचं? तो शांत झाला की आपोआप त्याला त्याची चूक कळेल आणि तुझ्याकडे तो येईल, त्यामुळे तू आता विचार करू नकोस.”
Sadhi Mansa 09 september 2025 full written episode update
कलेकडून अद्विकची समजूत
ती त्याला ‘चांदेकर’ म्हणून संबोधते आणि पुढे सांगते की रागाच्या भरात माणसाचा जिभेवरचा ताबा सुटतो आणि मनावर अजिबात कंट्रोल राहत नाही. पण शांत झाल्यावर त्याला सर्वकाही रियलाईज होतं आणि पश्चाताप होतो. त्यामुळे सोहमलाही असंच होईल आणि तो येऊन तुझी माफी मागेल, अशी ती त्याला खात्री देते. ती म्हणते की प्रत्येकाच्या मनात प्रेम, माया, वात्सल्य या सगळ्या भावना असतात, पण काही जण त्या व्यक्त करतात तर काही नाही. सोहमच्या बाबतीतही असेच झाले आहे; तो विचित्र किंवा वाईट नाहीये, जे घडलं ते चुकून झालंय. ती अद्विकला स्वतःला त्रास करून न घेण्याची विनंती करते.
कलाकारांच्या मनाची उपमा
कला त्याला समजावते की, “आम्हा कलाकारांचं असंच असतं. काम करताना आम्ही इतके मन लावून काम करतो की देहभान हरपून जातो. कामातून मिळणारा पैसा किंवा प्रसिद्धी महत्त्वाची नसते, फक्त काम परफेक्ट आणि उत्तम झालं पाहिजे, एवढाच आमचा ध्यास असतो.” ती सांगते की सोहमचंही अगदी तेच झालं. त्याने मन लावून आणि जिद्दीने काम केलं, पण नंतर जेव्हा त्याला कळालं की हे यश स्वतःच्या जोरावर नाही, तर तुझ्यामुळे मिळालं आहे, तेव्हा कदाचित त्याला वाईट वाटलं असेल. जेव्हा त्याला सगळ्या गोष्टी रियलाईज होतील, तेव्हा तो सर्वकाही समजदारपणे मान्य करेल, त्यामुळे विचार करू नकोस, अशी ती अद्विकची समजूत काढते.
संवादाचे महत्त्व आणि भासातून जागृती
यावर उपाय म्हणून ती त्याला सोहमशी ‘संवाद’ साधायला सांगते. ती म्हणते की शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केल्यास तो सर्व काही सांगेल आणि तुमच्यातील वादविवाद निघून जाऊन फक्त प्रेम आणि संवादच उरेल. ती समजावते की, “एखादी गोष्ट आपल्या मनात असली की ती समोरच्या व्यक्तीबरोबर व्यक्त केली आणि त्याचंही म्हणणं ऐकलं की सगळं शांतपणे हँडल होतं. मग चिडचिड करण्यात काय अर्थ आहे?” कलाचा हा भास त्याला सर्व काही समजावून सांगतो आणि अद्विक शांतपणे झोपी जातो.
अद्विकला जाणवणारी कलेची खरी गरज
झोपेतून जागे झाल्यावर अद्विकच्या लक्षात येतं की इतका वेळ जी बोलत होती ती खरी कला नव्हती, तर तो केवळ एक भास होता. कलामुळेच त्याच्या समस्यांचे निराकरण होते, हे त्याला जाणवते. तो विचार करतो, “आजपर्यंत प्रत्येक दुःखातून, प्रत्येक संकटातून एकटा बाहेर आलो, एकटा सामोरं गेलो. मग आज असं का वाटतंय की या दुःखामध्ये खरी माझ्याबरोबर हवी होती, मला साथ द्यायला, मला समजून घ्यायला.” अद्विकला तिची खरी कमी जाणवायला लागते आणि तिची भयंकर आठवण येत असते.
कलेच्या स्वागताची तयारी आणि अद्विकचा संताप
सकाळी घरातील सर्वजण डायनिंग टेबलवर जमलेले असतात. आबा सर्वांना सांगतात की कालच्या प्रकाराबद्दल कोणीही सोहमशी बोलू नये आणि त्याला त्रास होईल असे वागू नये. तितक्यात ते विचारतात की कला येत असल्यामुळे तिच्या आवडीचा उपमा केला आहे का. काही वेळाने अद्विक एकटाच एअरपोर्टवरून परत येतो आणि प्रचंड चिडलेला असतो. तो सांगतो की तो कितीतरी वेळ तिथे थांबला, पण कला कुठेच दिसली नाही आणि फोनही उचलत नाहीये. तो रागाने म्हणतो, “ती अगदी बेजबाबदार व्यक्ती आहे, तिला अजिबात कसले मॅनर्स नाहीत. कंटाळून मी घरी निघून आलोय. आता मला तिच्याबद्दल काही विचारू नका.”
कलेचा शोध आणि वाढती चिंता
आबा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. अद्विक सांगतो की तिने विमानात बसायच्या आधी काहीही सरळ सांगितले नाही. तेव्हा आबा अंदाज लावतात की कोल्हापुरात उतरल्यावर ती कदाचित आईच्या आठवणीने आधी तिच्या घरी गेली असेल. आबांच्या सूचनेनुसार, तो लगेच तिच्या आईला, मिसेस खरेंना फोन लावतो. पण तिकडून कळते की कला तिथेही आलेली नाही. “अहो सापडतच नाही ती सकाळपासून,” असे तो चिडून बोलतो.
संगीकडून मिळालेला महत्त्वाचा सुगावा
तेवढ्यात संगीताचे लक्ष कॅलेंडरकडे जाते आणि ती अद्विकला विचारते, “जावई बापू, आज काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आता माझ्या ध्यानात आलं कुठे गेली असेल तुमची खरी.” ती त्याला आजच्या तारखेकडे लक्ष द्यायला सांगते आणि म्हणते की आजच्या दिवशी ती मंदिरात जातेच. “तुम्ही तिचे हजबंड आहात ना, मग तुम्ही शोधा की तुमची खरी कुठे आहे,” असे म्हणून ती फोन ठेवते. आबा विचारतात की काही कळालं का, त्यावर अद्विक “बघतोय, जातोय एका ठिकाणी शोधायला” असे सांगून निघून जातो.
मंदिरात उलगडले वाढदिवसाचे रहस्य
इकडे रोहिणी आणि रजनी त्यांच्यात काय चालले आहे यावर लक्ष ठेवून असतात आणि अद्विक तिच्या आठवणीने वेडा झाल्याचे बोलतात. दुसरीकडे, कला अंबाबाईच्या देवळात आलेली असते, कारण आज तिचा वाढदिवस असतो. ती दर्शन घेत असताना, गुरुजी तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. हे संभाषण अद्विक गपचूप ऐकतो आणि त्याला कळते की आज कलाचा वाढदिवस आहे.
अद्विकचा सरप्राईज वाढदिवसाचा प्लॅन
अद्विक कलाला घरी घेऊन येतो. ती आल्या आल्या आबांचे दर्शन घेते. आबा तिला प्रवासाबद्दल विचारतात आणि अद्विक तिच्यासाठी कसा कासावीस झाला होता हे सांगून त्याला चिडवतात. कला सांगते की ती पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर गेली होती, म्हणून परत आल्यावर आभार मानण्यासाठी थेट अंबाबाईच्या दर्शनाला गेली होती. कला फ्रेश होण्यासाठी वर गेल्यानंतर अद्विक उत्साहाने आबांना सांगतो की, “अहो आज खरीचा वाढदिवस आहे आणि तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचा आहे.”
अद्विकचा खास प्लॅन आणि रोहिणीचा डाव
हे ऐकून घरातले सर्वजण उत्साही होतात आणि तिच्या आवडीचे जेवण बनवण्याबद्दल बोलू लागतात. पण अद्विक त्यांना शांत करतो आणि सांगतो की प्लॅनिंग तो करणार आहे, कारण त्याला तिला एक मोठे सरप्राईज द्यायचे आहे. तो सांगतो, “मी आपली गाडी सजवणार, केक बनवणार आणि तिला लांब असं घेऊन जाणार आहे. ती आणि मी, आम्ही दोघेच आज अख्खा दिवस घालवणार आहोत.” हे सगळं रोहिणी ऐकत असते आणि तिला हे अजिबात आवडत नाही. ती त्यांचा प्लॅन उधळून लावण्याचा विचार करते.
सर्वांच्या संमतीने प्लॅन निश्चित
अद्विक सर्वांना बजावतो की कोणीही कलाला काही कळू देऊ नका आणि अगदी नॉर्मल वागा. सरोज त्याच्या निर्णयाला पाठिंबा देते. रजनी औक्षणाबद्दल विचारते, तेव्हा अद्विक सांगतो की ते सर्व कार्यक्रम संध्याकाळी घरी आल्यावर करता येतील, पण दिवसभर त्याला तिच्यासोबत एकट्याने घालवायचा आहे. सरोजने परवानगी दिल्याने आणि अद्विकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आबाही तयार होतात.
कलेची स्वप्ने आणि रोहिणीचे कारस्थान
इकडे कला फ्रेश होऊन आरशासमोर उभी असते आणि खूप आनंदी असते. ती स्वतःशीच म्हणते, “मला पूर्ण गॅरंटी आहे, चांदेकर माझा वाढदिवस नक्की स्पेशल करणार. तो काय विसरणार नाही.” लग्नानंतर पहिल्यांदाच अद्विकबरोबर वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाल्याने ती वेगवेगळी स्वप्ने रंगवत असते. तिला नवऱ्याकडून फार मोठ्या अपेक्षा नसतात, फक्त त्याने वाढदिवस लक्षात ठेवावा आणि प्रेमाने काहीतरी करावे एवढीच तिची इच्छा असते.
वाढदिवसाच्या दिवसाची खास अपेक्षा
ती स्वतःशीच बोलत असते की, “या निमित्ताने का होईना, चांदेकर आणि मी खूप स्पेशल असा वेळ घालवू शकतो. आजचा अख्खा दिवस मला तुझ्याबरोबर घालवायचा आहे.” तिला अद्विक सोबत असण्याने स्वर्गसुख मिळेल असे वाटत असते. ती लाजत-मुरडत असते, पण काही वेळाने तिच्या मनात शंका येते, “इतका वेळ झाला मी वर आले, हा चांदेकर राहिला कुठे? त्याच्या लक्षात तरी आहे का माझा वाढदिवस आहे म्हणून? लक्षात असतं तर नक्कीच माझ्यामागे आला असता.”
घरातून मिळालेली निराशा
अखेर ती स्वतःच खाली जाते. ती आनंदाने जिन्यावरून पळत खाली येते, तिला वाटते की घरातले कोणीतरी तिला वाढदिवसाबद्दल विश करेल. पण सरोज तिला न बघितल्यासारखे करून फोनवर बोलत लांब जाते. आबा मुद्दाम पेपर वाचायला लागतात. ती चांदेकरबद्दल विचारते, तेव्हा आबा सांगतात की त्याला अर्जंट कामासाठी बाहेर जावे लागले आणि यायला उशीर होईल.
वाढदिवस विसरल्याने कला नाराज
हे ऐकून कला खूप नाराज होते. अनामिका सुद्धा तिला धक्का देऊन पुढे निघून जाते. या सगळ्या लोकांना आपला वाढदिवस कसा लक्षात नाही, म्हणजे अद्विकनेच यांना सांगितले नसावे, असा विचार करून ती दुःखी होते. ती किचनमध्ये जाते, पण तिथे रजनीसुद्धा तिच्याकडे लक्ष देत नाही. कोणाकडूनच अपेक्षा न करण्याचा विचार करून ती खूप निराश होते.
रोहिणी आणि राहुलचा खतरनाक प्लॅन
हीच संधी साधून रोहिणी तिच्या आनंदावर विरजण घालण्याचा निश्चय करते. ती लगेचच राहुलला फोन करते आणि त्याला सांगते की अद्विकने कलासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे, जिथे तो तिला गाडीने कुठेतरी लांब घेऊन जाणार आहे. रोहिणी राहुलला सांगते की, आपण असे काहीतरी करायचे आहे जेणेकरून कला त्या ठिकाणी उशिरा पोहोचेल किंवा पोहोचणारच नाही. त्यामुळे अद्विक चिडेल, त्यांचे भांडण होईल आणि सगळा प्लॅन फ्लॉप होईल. राहुलला हा प्लॅन आवडतो आणि तो लगेचच एका माणसाला तिच्याकडे पाठवतो.
पुढील भागाची हिंट
राहुलने पाठवलेला माणूस रोहिणीकडे आलेला असतो. तो तिला सांगतो की राहुल साहेबांनी त्याला पाठवले आहे आणि आज दिवसभर कलाच्या गाडीवर थांबून ती जिथे म्हणेल तिथे तिला घेऊन जायचे आहे. रोहिणी त्याला पुढचा सगळा प्लॅन समजावून सांगते. ठरल्याप्रमाणे, अद्विक फोन करून कलाला बोलावून घेतो. कला गाडीजवळ येते आणि तिचा ड्रायव्हरही तयार असतो. आता कला त्या ड्रायव्हरसोबत अद्विकने बोलावलेल्या ठिकाणी सुरक्षित पोहोचणार का, की रोहिणीने ठरवल्याप्रमाणे त्यांच्या प्लॅनचा पचका होणार, हे पाहण्यासाठी पुढील भाग पाहावा लागेल.